🌟वाशिम जिल्ह्यातील मालेगावात निर्दयतेने अवैधपणे गोवंश वाहतूक करणाऱ्यांवर ०२ कारवाया...!


🌟घटनेत ०३ आरोपींसह २४.५० लाखांचा मुद्देमाल जप्त🌟

फुलचंद भगत

मंगरुळपीर :- प्राण्यांवरील अत्याचार संदर्भात शासनाने निर्गमित केलेल्या अधिनियमांन्वये वाशिम जिल्ह्यात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ अन्वये क्रूरपणे होणाऱ्या जनावरांच्या वाहतूक व बेकायदेशीर कत्तली, बेकायदेशीर गोवंश मांस बाळगणे किंवा प्राण्यांना क्रूरतेने वागविण्याबाबत आरोपींवर वाशिम पोलीस दलातर्फे वेळोवेळी कारवाई केली जाते.

     त्याच पार्श्वभूमीवर दि.१७.०७.२०२३ रोजी रात्री पो.स्टे.मालेगाव येथील DIAL 112 कर्तव्यावर असलेले बीट मार्शल यांना नियंत्रण कक्ष,वाशिम येथून प्राप्त माहितीवरून रात्रगस्त अधिकारी व बीट मार्शल यांनी अकोला-वाशिम रोडवरील ईराळा फाटा येथे उभ्या असलेल्या आयशर ट्रक क्र.MH12ALT1963 या वाहनाची पाहणी केली. त्या वाहनात निर्दयतेने कोंबून भरलेल्या अवस्थेत काळ्या रंगाच्या विविध वयोगटातील म्हैस जातीची १८ जनावरे निर्दयतेने बांधलेल्या अवस्थेत आढळून आली. सदर वाहनचालक नूर खान मुस्तफा खान, वय ३८ वर्षे, रा.कळमनुरी, जि.हिंगोली व मालक अशपाक शेख प्यारे, वय ३५ वर्षे, रा.कामठी, नागपूर यांना सदर जनावरांच्या खरेदी-विक्री संबंधाने कागदपत्रे तसेच वाहतुकीचा परवानाबाबत विचारणा केली असता त्यांनी चुकीची व उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे सदर वाहन पंचासमक्ष जप्त करून पो.स्टे.मालेगाव येथे लावण्यात आले. सदर आरोपींवर पो.स्टे.मालेगाव येथे अप.क्र.३२८/२३, कलम ११(१), ११(१)(अ), ११(१)(ड), ११(१)(ई), ११(१)(क) प्राण्यांना क्रूरपणे वागविण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम १९६० सहकलम ६६/१९२ मोटार वाहन कायदा प्रमाणे कार्यवाही करण्यात आली असून एकूण ०२ आरोपींसह ११.८६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरु आहे.

            सदर कारवाई मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह(IPS), अपर पोलीस अधीक्षक श्री.भारत तांगडे, उपविभागीय पोलीस अधिकारी,वाशिम श्री.सुनीलकुमार पुजारी  यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि.रामकृष्ण महल्ले, मपोउपनि.सुनिता नारखेडे, पोलीस अंमलदार गजानन पांचाळ, गणेश मेटांगडे, जयशंकर पाटील, ज्ञानेश्वर सानप, केशव गोडघासे यांनी पार पाडली. नागरिकांनी अश्याप्रकारची काही तक्रार असल्यास नियंत्रण कक्ष वाशिम किंवा DIAL 112 किंवा संबंधित प्रभारी पोलीस अधिकारी यांना माहिती द्यावी, असे आवाहन वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे.


प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या