🌟महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना पदावरून हटवण्याची मागणी....!


🌟महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेत केली मागणी🌟


मुंबई (दि.१७ जुलै २०२३) - उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी पक्षांतर केल्यामुळे त्या संवैधानिक पदावर राहून योग्य न्याय करू शकत नाही, त्यामुळे त्यांना पदावरून हटविण्यात यावे, या मागणीसाठी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने आज मा. राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन येथे भेट घेतली.

आज परिषद सभागृहात नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर करण्याबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली हा घटनात्मक पेच सोडवावा यासाठी आज महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने मा. राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन येथे भेट घेतली. या भेटीत महाविकास आघाडीच्या ४० आमदारांचा समावेश होता नीलम गोऱ्हे यांना उपसभापती पदावरून हटवा,  अशी मागणी आम्ही केली असल्याची माहिती विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली.

उपसभापती यांनी पक्षांतर केल्यामुळे त्या पदावर राहून त्या न्याय देऊ शकत नाही अशी विनंती राज्यपाल यांना केली. ऍड. जनरल यांच्याशी चर्चा करून याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा. तसेच हा पेच सुटेपर्यंत त्यांनी समिती नेमावी आणि कामकाज चालवावे , अशी  मागणी केल्याचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे  यांनी सांगितले.......

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या