🌟भारतीय जनता पक्षाच्या परभणी ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदावर संतोष मुरकूटे यांची निवड...!


🌟नवनिर्वाचित ग्रामीण जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे यांच्या स्वागता निमित्त आज गंगाखेडात भव्य रॅली🌟

परभणी (दि.२० जुलै २०२३) : भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित परभणी जिल्ह्याचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष संतोष मुरकूटे यांच्या स्वागताच्या निमित्ताने आज गुरुवार दि.२० जुलै २०२३ रोजी त्यांच्या मुळ गावी गंगाखेडात दुपारी ०३-०० वाजता भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात येणार आहे.

                 जिल्हाध्यक्ष मुरकूटे यांचे जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर गंगाखेडात प्रथमच आज गुरुवारी आगमन होणार आहे. त्यानिमित्ताने मुरकूटे यांचे भारतीय जनता पक्षाच्या शहर व तालुका शाखेतर्फे जोरदार स्वागत करण्यात येणार आहे. नांदेड रस्त्यावरील श्री दत्त मंदिरापासून या निमित्ताने मोठी मोटारसायकल रॅली काढण्यात येणार असून दुपारी ०३-०० वाजता आयोजित केलेल्या या रॅलीत भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकार्‍यांसह सदस्यांनी व नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन शहर व तालुका शाखेतर्फे करण्यात आले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या