🌟हिंगोली जिल्ह्यात शासन आपल्या दारी कार्यक्रमांतर्गत सुशिक्षित बेरोजगार उमेदवारासाठी ऑनलाईन रोजगार मेळावा...!


🌟बेरोजगारांसाठी दि.07 जुलै ते 08 जुलै या कालावधीत पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन🌟

हिंगोली (दि.05 जुलै 2023) : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व मॉडेल करिअर सेंटर (एनसीएस) हिंगोली यांच्यामार्फत हिंगोली जिल्ह्यातील नोकरी इच्छूक उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमांतर्गत हिंगोली जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी दि.07 जुलै ते 08 जुलै 2023 या कालावधीत पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 

क्रेडिट ऍक्सेस ग्रामीण लि. नागपूर (मायक्रो फायनान्स) कंपनीमध्ये ट्रेनी केंद्र मॅनेजरची बारावी, आयटीआय, डिप्लोमा, पदवी, पदवीधर शैक्षणिक पात्रतेची हिंगोलीचे-10, परभणी-10 व नांदेड-10 जागा पुरुष 19 ते 30 व महिला 19 ते 35 वयोगटातील उमेदवारामधून भरावयाची आहेत. यासाठी स्वत:ची टुव्हीलर आणि लायसन, ई-आधार आवश्यक आहे. या पदासाठी 11 हजार 500 मासिक प्रोत्साहन भत्ता अधिक पेट्रोल भत्ता अधिक वार्षिक बोनस अधिक राहणे फ्री आहे. तसेच मनसा मोटर्स हिंगोली येथील कॉम्प्यूटर ऑपरेटर-3, अकाऊंटंट-2, मेकॅनिक-7, मार्केटींग ऑफिसर-10, सिआरओ-3, शिपाई-3, हेल्पर-3 याप्रमाणे पदे भरावयाची आहेत. ही पदे 18 ते 40 वयोगटातून भरावयाची आहेत. या सर्व पदासाठी वेतन 7 हजार ते 15 हजार पर्यंत असणार आहे.  

या ऑनलाईन रोजगार मेळाव्यात क्रेडिट ऍक्सेस ग्रामीण लि. नागपूर (मायक्रो फायनान्स) हिंगोली, मनसा मोटर्स हिंगोली या कंपनीचे 60 पेक्षा अधिक रिक्तपदे अधिसूचित केलेली आहेत. जिल्ह्यातील दहावी, बारावी, पदवी, आयटीआय, डिप्लोमा, टायपिंग, टॅली या शैक्षणिक अर्हतेनुसार https://rojgar.mahaswayam.gov.in व www.ncs.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अधिसूचित केलेली आहेत. 

नोकरी इव्छुक उमेदवारांनी वरील संकेतस्थळावर नोंदणी पूर्ण करुन शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्त पदासाठी ऑनलाईन अर्ज करावेत. जेणे करुन त्यांना ऑलनाईन रोजगार मेळाव्यात सहभागी होता येईल. याबाबत काही अडचण आल्यास 7385924589 किंवा 7972888970 या भ्रमणध्वनी  क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त डॉ. राजपाल कोल्हे यांनी केले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या