🌟वाजेगाव-धनेगाव रस्त्यावरील एका दुकानात केला होता प्रतिबंधीत गुटख्याचा साठा🌟
नांदेड (दि.२१ जुलै २०२३) - येथील पवित्र श्री.तखत सचखंड हुजूर साहीब गुरुद्वारामुळे संपूर्ण जगात पवित्र नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नांदेड नगरील प्रतिबंधीत अवैध गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची तस्करीसह विक्री करणाऱ्यांनी अक्षरशः उच्छाद मांडला असल्याचे पुन्हा एकदा काल गुरुवार दि.२० जुलै २०२३ रोजी नांदेड ग्रामीण पोलिस प्रशासनाने केलेल्या धाडसी कारवाई वरून उघडकीस आले असून येथील वाजेगाव-धनेगाव रस्त्यावरील एका शटरबंद दुकानात अवैध गुटखा साठा असल्याची कुणकूण पोलिसांना लागल्यामुळे काल गुरूवारी रात्रीच्या सुमारास ग्रामीण पोलिसांना तात्काळ कारवाई करीत शटर उघडून बघीतले असता त्यात विविध कंपन्याच्या नावाच्या गुटखा पुड्यांची पाकीट सुगंधीत सुपारी असा अंदाजे १५ लाख रुपयांचा अवैध गुटखा साठा आढळून आला.
संबंधित अवैध गुटखा साठा आजीम नावाच्या व्यक्तीचा असल्याचे पोलिस सुत्रांकडून समजते सदरील धाडसी कारवाई नांदेड ग्रामीण पोलिस स्थानकाचे पोलिस अधिकारी पो.नि. जगदीश भंडरवार व सहकारी पथकाने केली या संदर्भात अन्न व औषधी प्रशासनाचे अधिकारी रमाकांत पाटील यांच्या तक्रारी वरुन नांदेड ग्रामीण पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे समजते....
0 टिप्पण्या