🌟गंगाखेड येथे हजारो लोकांनी सह्या करून झालेल्या गलिच्छ राजकारणाचा निषेध करत मनसेच्या आंदोलनाला पाठिंबा दिला...!


🌟यामध्ये सर्व कर्मचारी असो शेतकरी व व्यापारी असलेल्या लोकांनी सर्वांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला🌟

गंगाखेड (दि.०९ जुलै २०२३) : महाराष्ट्र मध्ये चालू असलेल्या गलिच्छ राजकारणाचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एक सही संतापाची हा उपक्रम राबवून गंगाखेड शहरातील अहिल्याबाई होळकर चौकामध्ये मोठ्या प्रमाणात सह्या घेण्यात आल्या यावेळी नागरिकांनी आपल्या भावना पण व्यक्त केल्या आणि महाराष्ट्राची राजकारणाला कंटाळलेले लोकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला.

महाराष्ट्रातील राजकारणात सर्व पक्ष एकत्र येऊन सतेच्या लालसे पोटी काहीपण चालू असलेल्या राजकारणाचा सर्व स्तरातून निषेध करत आहे व त्याला सामान्य नागरिक सुद्धा कंटाळलेला आहे यांनी काय विचार धारणेला धरून मतदान केलेल असते व सते साठी हे सर्व बाजूला ठेवून यांना फक्त आणि फक्त यांच्या स्वार्थापोटी एकत्र आलेल्या आहेत ही गोष्ट कुठेतरी जनतेच्या मनात  खतखत आहे व ती बाहेर काढण्यासाठी एक स्वाक्षरी संतापाची ही मोहीमेला यामुळे भरपूर पाठिंबा मिळालेला त्यांना दिसत आहे सर्व लोकांनी या संदर्भात सह्या करून व त्यांच्या या मोहिमेला पाठिंबा दिला आहे यामध्ये सर्व कर्मचारी असो शेतकरी व व्यापारी असलेल्या लोकांनी सर्वांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला आहे

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष यादव महात्म्य, तालुका अध्यक्ष राहुल डोंगरे, शहराध्यक्ष आकाश जामगे, तालुका उपाध्यक्ष निखिल राठोड, तालुका संघटक गजानन भुसनर, माधव पारसे, अनिरुद्ध मोरे, संतोष कुंभार, मंदार कुलकर्णी, मयूर कुलकर्णी, हनुमान डबडे, माधव भिसे ,विशाल जाधव, व सर्व मनसैनिकांनी परिश्रम घेतले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या