🌟विज्ञान संवादक धनंजय रावल यांचे प्रतिपादन🌟
जिंतूर प्रतिनिधी / बी.डी.रामपूरकर
जिंतूर (दि.१३ जुलै २०२३) : - खरी गुणवत्ता ही देशातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येच विखुरलेली असून त्यांना योग्य मार्गदर्शन आणि मेहनतीची जोड देता आली तर भविष्यातील उद्योजक आणि शास्त्रज्ञ ग्रामीण भागातीलच असतील असे प्रतिपादन विज्ञान संवादक धनंजय रावल यांनी केले .
येथील ज्ञानोपासक महाविद्यालयात अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष च्यावतीने उद्योजकता विकास विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.श्रीधर भोंबे तर व्यासपीठावर डॉ. निंबाळकर, डॉ. दुर्गादास कान्हडकर, उपप्राचार्य एम. एस. दाभाडे हे उपस्थित होते. पुढे बोलताना धनंजय रावल म्हणाले की तुमच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये मन लावून काम करा. गुण मिळविण्यासाठी काम करू नका तर चांगली गुणवत्ता निर्माण करण्यासाठी काम करा. येणाऱ्या काळात औंढा नागनाथ येथे होत असलेल्या लियगो प्रकल्पासाठी अनेक संशोधकांची गरज आहे आणि ते संशोधक या परिसरातूनच निर्माण व्हावेत अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच त्यांनी चंद्रयान मोहिमेविषयी विद्यार्थ्यांना विस्ताराने माहिती दिली .अध्यक्षीय समारोपात उपप्राचार्य एम. एस. दाभाडे म्हणाले की ज्ञानात खूप मोठी शक्ती असते .ज्ञान माणसाला उच्च शिखरावर नेऊन पोहोचवीत असते . खूप साधी वाटणारी माणसं ज्ञानाच्या बळावर खूप मोठी झालेली आहेत .कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. दुर्गादास कान्हडकर यांनी केले तर संचालन आणि आभार प्रा. डॉ. श्याम गोरे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमास प्राध्यापक आणि महाविद्यालयातील विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते......
0 टिप्पण्या