🌟नांदेड येथील नवीन सिडको भागातील पाण्याच्या टाकी जवळ २० वर्षीय तरुणाचा भर दिवसा खंजीरने भोसकून खुन....!


🌟या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले🌟

नांदेड (दि.१४ जुलै २०२३) - नांदेड येथील सिडको नवीन परिसरातील पाण्याच्या टाकी जवळ शुक्रवार दि.१४ जुलै २०२३ रोजी भर दिवसा दुपारी ०४-०० वाजेच्या सुमारास एका २० वर्षीय युवकाचा खंजीरने भोसकून निर्घृण खून करण्यात आल्याची भयंकर घटना घडली या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते.


या खुनाच्या घटने प्रकरणी पोलिसांनी एकास ताब्यात घेतले असून सदर प्रकरणी सिडको ग्रामीण पोलिस स्थानकात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. नांदेड वाघाळा महापालिकेच्या हद्दीत असलेल्या आजदवन येथील अवधूत काळबा गिरडे वय २० वर्षे या युवकास जुन्या भांडणाच्या कारणावरून सिडको येथील पाण्याच्या टाकीजवळ खंजीरने भोसकून व दगडाने ठेचून त्याचा निर्घृण खून करण्यात आला या घटने प्रकरणी एका युवकास ताब्यात घेतले असल्याचे पोलिसांनी सांगितले.मात्र नाव जाहीर करण्यात आले नाही. 

सदर घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी गुरव आणि गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर ग्रामीण ठाण्याचे पोलिस निरीक्षक जगदीश भंडरवार यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली व तात्काळ आरोपीला अटक करण्यासाठी पोलिसांना सूचना केल्या. सदर घटने बाबत परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत असून पोलिसांनी घटनास्थळावर तात्काळ दाखल होऊन युवकाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात पाठवला.... 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या