🌟लोकशाहीचे संपादक कमलेश सूतार यांचं शतशः अभिनंदन - एस.एम.देशमुख


🌟किरीट सोमय्यांची अश्लील क्लीप दाखवून लोकशाही न्युजने त्यांच्या नैतिकतेचा बुरखा टराटरा फाडण्याचे धाडस केलं🌟


भाजप नेते किरीट सोमय्या यांची एक अश्लील क्लीप लोकशाही न्यूजने काल दाखविली.. लोकशाहीचे संपादक कमलेश सूतार यांचं यासाठी अभिनंदन केलं पाहिजे की, किरीट सोमय्यांच्या नैतिकतेचा बुरखा टराटरा फाडण्याचे धाडस त्यांनी केलं.. क्लीपमुळं राज्यातील वातावरण तापलं असल्यास नवल नाही.

कालच्या धक्कयातून सावरलयानंतर किरीट सोमय्या यांनी आज एक पत्रक काढून चौकशीची मागणी देवेंद्र फडणवीस त्यांच्याकडं केली आहे.. काल क्लीप आल्यापासून भाजपचे सगळे पोपट मौनात आहेत.. अशा स्थितीत किरीट सोमय्यांच्या पत्रावर देवेंद्र फडणवीस लगेच चौकशी करतील आणि क्लीप मागील सत्य प्रकाशात आणतील यावर महाराष्ट्रातील शेंबडं पोर तरी विश्वास ठेवेल का?


आणखी एक मुद्दा.. लोकशाहीने दाखविलेली क्लीप खोटी आहे, किंवा क्लीपशी छेडछाड केली गेलीय असं किरीट सोमय्या म्हणत नाहीत.. म्हणजे जी कलीप टीव्हीच्या पडद्यावर दिसते ती खरीच आहे हे सोमय्या अप्रत्यक्ष मान्य करतात..असं नसतं तर आतापर्यंत किरीट सोमय्यांनी लोकशाही न्यूज चॅनलला शंभर कोटीच्या अब्रूनुकसानीची नोटीस पाठविली असती पण त्यांनी तसं न करता देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलंय.. ज्यानं काहीच होणार नाही हे सोमय्या जाणून आहेत. 

माझ्याकडून कोणत्याही महिलेवर अत्याचार झाला नाही हीच टेप ते वारंवार वाजवत आहेत.. जे व्हिडीओत दिसतंय ते सहमतीनं असू शकेल.. त्यामुळं ते तसं सागत असतील पण मग सार्वजनिक नैतिकतेच्या ज्या गप्पा किरीट सोमय्या मारतात त्याचं काय? आर्थिक भ्रष्टाचाराचे अनेक प्रकरणं त्यांनी बाहेर आणली.. मात्र स्व:च्या या नैतिक भ्रष्टाचाराचे काय? त्यावर सोमय्या आणि भाजप काहीच बोलत नाही.. सार्वजनिक जीवनात वावरणारयांनी किमान पथ्ये पाळली पाहिजेत...ती हल्ली पाळली जात नसल्यानं कधी हे तर कधी ते नागडे होतात.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या