🌟पाथरी तालुक्यात बोगस बि-बियान विक्री : ईजिंग सन सिड्सचे तेरा बॅग सोयाबीन बियाणे उगवलेच नाही...!


🌟तालुक्यातील तुरा येथील चार शेतकऱ्यांची कृषी विभागाकडे कंपणीवर कार्यवाही करण्याची मागणी🌟

प्रतिनिधी

पाथरी (दि.०८ जुलै २०२३) :- तालुक्यातील तुरा येथील चार शेतक-यांनी रायजिंग सन कंपनीच्या  तब्बल तेरा बॅग सोयाबीन बियाणांची ३० जुन आणि १ जुलै रोजी पुरेशा ओलीवर पेरणी केली होती.मात्र आठ,नऊ दिवसा नंतर ही हे बियाणे उगवले नसल्या या चार ही शेतक-यांनी कृषी विभागा कडे धाव घेत या विषयी मदतीची मागणी करत संबंधित कंपणीवर कठोर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.

पाथरी तालुक्यातच्या काही भागात २९ आणि ३० जुलै रोजी पेरणी योग्य पाऊस झाला होता. याच पावसावर तुरा येथील शेतकरी भागवत रामभाऊ ढाणे यांनी रायझिंग  सिड्स प्रा.लि. या कंपणीच्या आर एस २२८ या वाणाच्या सोयाबीन बियाणाच्या सहा बॅग  मसला शिवारातील गट क्र.६८ मधील तीन हेक्टर क्षेत्रात १ जुलै रोजी पेरणी केली होती. त्याच बरोबर अमोल बन्सीधर गायकवाड यांनी तुरा शिवारातील गट नंबर ८ मधील २ हेक्टर ४२ आर मध्ये याच कंपनीच्या दोन बॅग तर परसराम हरीभाऊ राठोड यांनी मसला शिवारातील एक हेक्टर विस आर मध्ये तीन बॅग आणि धनंजय गणेशराव आडसकर यांनी तुरा शिवारातील १ हेक्टर ६० आर क्षेत्रात याच कंपनीच्या आर एस २२८ या वाणाची पेरणी केली होती मात्र आठ नऊ दिवसाचा कालावधी होऊन ही सोयाबीन बियाणे उगवले नसल्याने या चार शेतक-यांनी तालुका कृषी अधिकारी यांच्या कडे धाव घेत या प्रकाराचा तात्काळ पंचनामा करून शेतक-यांना न्याय द्यावा आणि संबंंधित रायझिंग सन सिड्स प्रा. लि. या कंपनीवर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या