🌟परभणी तालुक्यात कृषी दिना मोठ्या उत्साहाने साजरा : कृषी दिन कार्यक्रमात महिला शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती.....!


🌟तालुका कृषी अधिकारी नित्यानंद काळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते कार्यक्रमाचे आयोजन🌟


परभणी तालुक्यात दि.१ जुलै २०२३ रोजी कृषी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला,जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी परभणी कार्यालय,प्रकल्प संचालक आत्मा परभणी,तालुका कृषी अधिकारी परभणी यांनी कै.वसंतराव नाईक माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या ११० व्या जयंतीनिमित्त कृषी दिनाचे आयोजन, तालुका कृषी अधिकारी परभणी,  नित्यानंद काळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले,या कार्यक्रमाचे अध्यक्ष  विजयकुमार लोखंडे जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी, तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रगतशील शेतकरी . जनार्धन आवरगंड माखणी, तालुका पूर्णा हे उपस्थित होते, तसेच इतर मान्यवर प्रकल्प संचालक आत्मा .दौलत चव्हाण, उपविभागीय कृषी अधिकारी.रवी हरणे श्री. दीपक सामाले कृषी विकास अधिकारी परभणी,बलसेटवार जिल्हा कृषी अधिकारी जिल्हा परिषद.संदीप जगताप कृषी उपसंचालक परभणी, तालुका कृषी अधिकारी परभणी,.नित्यानंद काळे, श्री.अमोल काकडे शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र परभणी,.माणिक रासवे पत्रकार ॲग्रोवन,उदय वाईकर सिनेनायक मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात कै.वसंतराव नाईक आणि विद्येची देवता सरस्वती यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आणि दीप प्रज्वलन करून मोठ्या उत्साहात करण्यात आली.


या कार्यक्रमांमध्ये राज्यस्तरावर जिल्हास्तरावर पीक स्पर्धेमध्ये विजेते झालेले शेतकरी यांचा सत्कार समारंभ प्रमाणपत्र आणि तृणधान्य वर्षानिमित्त तृणधान्य किट देऊन करण्यात आला,तसेच कृषी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला व पुरुष शेतकऱ्यांचे सन्मान करण्यात आले तसेच,श्रीमती. स्वाती घोडके सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा परभणी यांना कृषी विभागामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल प्रमाणपत्र आणि तृणधान्य किट देऊन सन्मानित करण्यात आले सर्व मान्यवरांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आणि पंडित थोरात,मुक्ता झाडे, जयश्री मुंडे, जनार्धन आवरगंड या सर्व शेतकऱ्यांनीही त्यांचे मनोगत व्यक्त केले सध्या पेरणीचा काळ असल्याने शेतकऱ्यांची बियाणे खते यासाठी चाललेली घाईगडबड असूनही परभणी तालुक्यातील खूप मोठ्या संख्येने महिला आणि पुरुष शेतकरी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती.स्वाती घोडके सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा परभणी, तसेच प्रस्तावना डॉ.संदीप जगताप आणि आभार प्रदर्शन श्री. कैलास गायकवाड मंडळ कृषी अधिकारी परभणी आणि कृषी दिनाचे महत्त्व कृषी सहाय्यक परभणी श्री. बबन राठोड यांनी केले कार्यक्रमासाठी परभणी तालुक्यातील सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. यानिमित्ताने जिल्ह्यांतर्गत महिलांचा अभ्यास दौरा आयोजन करण्यात आला होता.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या