🌟पुर्णेतील स्वातंत्र्य सैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयात कृषीदिन व वसंतराव नाईक यांची जयंती साजरी....!


🌟प्राचार्य डॉ.रामेश्वर पवार यांनी हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून केले अभिवादन🌟 

पुर्णा (दि.०१ जुलै २०२३) - येथील स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयात  महाराष्ट्राच्या हरितक्रांतीचे प्रणेते तथा माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती कृषी दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

 या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रामेश्वर पवार यांनी हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी विद्यार्थी यांनी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सांस्कृतिक प्रभारी प्रा.डॉ. प्रकाश सूर्यवंशी यांनी मांडले. कार्यक्रमाचे आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ. प्रभाकर सूर्यवंशी यांनी केले.  या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व सांस्कृतिक विभाग यांनी परिश्रम घेतले. 

 याप्रसंगी  महाविद्यालयातील,प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या