🌟पुर्णा पाटबंधारे प्रकल्पाच्या येलदरी जलाशयात 53.33 टक्के पाणीसाठा....!


🌟या प्रकल्पात 124.670 दशलक्ष घनमीटर मृत साठा🌟

परभणी (दि.13 जुलै 2023) : पूर्णा पाटबंधारे प्रकल्पाच्या येलदरी जलाशयात गुरुवार 13 जूलै रोजी सकाळी 6-00 वाजेपर्यंत 53.33 टक्के एवढा जिवंत पाणीसाठा उपलब्ध आहे.

              या प्रकल्पात 124.670 दशलक्ष घनमीटर मृत साठा, 448.92 दशलक्ष घनमीटर जीवंत पाणीसाठा असा एकूण 572.762 दशलक्ष घनमीटर एकूण पाणीसाठा उपलब्ध आहे. प्रकल्पातील पाणी पातळी 457.795 मीटर एवढी आहे.

              मागील चोवीस तासात या प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊसच झाला नाही. त्यामुळे पाण्याची आवक 0 टक्के एवढीच आहे. या प्रकल्पात एकूण जिवंत पाणी साठा 55.33 टक्के एवढा आहे. दरम्यान, या प्रकल्पाच्या पाण्यावरच पुर्णतः अवलंबून जलविद्युत निर्मितीचे केंद्र पाण्याअभावी बंद आहे, अशी माहिती पूर्णा पाटबंधारे प्रकल्पाच्या सूत्रांनी दिली.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या