🌟अपंग प्रशिक्षण केंद्रात मान्यता प्राप्त अभ्यासक्रमासाठी 31 जुलै पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन....!


🌟प्रवेशितांची निवासाची व जेवणाची विनामुल्य सोय उपलब्ध आहे🌟

परभणी (दि.12 जुलै 2023) : अपंग कल्याण आयुक्तालय, पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजाभवानी अपंग प्रशिक्षण केंद्र, देगलूर जि.नांदेड या संस्थेत म.रा. व्यवसाय शिक्षण व परीक्षा मंडळ मुंबई मार्फत मान्यता प्राप्त अभ्यासक्रमासाठी 18 ते 40 वयोगटातील अपंग, मुकबधीर, मतिमंद, मुला-मुलींना प्रवेश देण्यात येत आहे. या प्रशिक्षण केंद्रात शिवण कर्तनकला, कॉम्प्यूटर अकाऊंटिंग, ऑफीस ऑटोमेशन व वेल्डर कम फॅब्रीकेशन इत्यादी अभ्यासक्रमांना प्रवेश देण्यात येत आहे. प्रवेशितांची निवासाची व जेवणाची विनामुल्य सोय उपलब्ध आहे. 

तरी इच्छुक अपंग, मुकबधीर, व मतिमंद मुला-मुलींनी किंवा पालकांनी दि. 31 जुलै, 2023 पर्यंत प्राचार्य, तुळजाभवानी अपंग प्रशिक्षण केंद्र, देगलूर जि. नांदेड येथे प्रवेशासाठी संपर्क साधण्याचे आवाहन कर्मशाळा अधिक्षक, तुळजाभवानी अपंग प्रशिक्षण केंद्र, देगलूर यांनी केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या