🌟परभणी शहरातील घरकुलधारकांचे अनुदान 28 जुलैपर्यंत खात्यात...!


🌟महानगर पालिका प्रशासनाचे आश्‍वासन : प्रभाकर लंगोटे यांचा इशारा🌟

परभणी (दि.22 जुलै 2023) :  प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत बांधकाम केलेल्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय टप्प्यातील लाभधारकांचे अनुदान 28 जूलै पर्यंत खात्यात जमा केले जाईल, असे आश्‍वासन महानगरपालिका प्रशासनाने दिले आहे.

            राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अर्बन सेलचे शहर जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक प्रभाकर लंगोटे यांच्यासह काही लाभार्थ्यांनी महानगरपालिकेचे लेखाधिकारी भगवान यादव यांच्यासह अन्य अधिकार्‍यांची भेट घेतली व या योजनेंतर्गत गेल्या चार-पाच महिन्यांपासून रखडलेले अनुदान तात्काळ लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करावे, अशी जोरदार मागणी केली. यावेळी संबंधित अधिकार्‍यांनी आरटीजीएसद्वारे लाभार्थ्यांच्या खात्यात हे अनुदान जमा होईल, असे आश्‍वासन देण्यात आले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या