🌟परभणी येथील माता रमाबाई आंबेडकर शिक्षण प्रसारक मंडळाला 'राष्ट्रीय एकात्मता गौरव पुरस्कार-2023' जाहीर....!


 🌟हा पुरस्कार वितरण सोहळा रविवार दि.16 जुलै रोजी शहरातील हॉटेल ग्रीन लिफ येथे होणार आहे🌟

परभणी (दि.15 जुलै 2023) परभणी जिल्ह्यात स्मृती रंगुबाई अंभोरे दुधगावकर यांनी स्थापन केलेल्या 1964 पासून समाजातील गोर, गरीब, गरजू विध्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अविरत शैक्षणिक कार्य करणारी तसेच 1964 पासून शासनाच्या अनेक विविध उपक्रमाची यशस्वीरीत्या जनजागृती करून समाज उपयोगी कार्यक्रम हाती घेऊन समाज घडविण्यात सक्रिय सहभाग असणारी माता रमाबाई आंबेडकर शिक्षण प्रसारक मंडळ परभणी तसेच या संस्थेच्या मार्फत चालत असलेले माता रमाबाई आंबेडकर विध्यार्थी वसतिगृच्या माध्यमातून लाखो विध्यार्थी घडविण्याचे कार्य स्मृती. रंगुबाई अंभोरे दुधगावकर नंतर स्मृती.जाईबाई अंभोरे दुधगावकर त्यानंतर स्मृती.अशोकराव अंभोरे दुधगावकर नंतर स्मृती. द्रौपदाबाई अंभोरे दुधगावकर यांच्या अध्यक्षतेखाली माता रमाबाई आंबेडकर शिक्षण प्रसारक मंडळ परभणी च्या वतीने करण्यात आले आहेत. 

      तोच शैक्षणिक वारसा ऍड.सुभाष अंभोरे दुधगावकर यांच्या अध्यक्षतेखाली यशस्वीरित्या चालत आहे. अध्यक्ष ऍड सुभाष अंभोरे यांच्या मार्गदर्शनाखाली माता रमाबाई आंबेडकर शिक्षण प्रसारक मंडळ परभणी चे सचिव तथा पत्रकार प्रमोद अशोकराव अंभोरे दुधगावकर यांनी समाजातील गोर, गरीब, गरजू, ग्रामीण व शहरी भागातील विवीध जाती धर्मांच्या विध्यार्थ्यांच्या कल्याणासाठी, शैक्षणिक विकासासाठी केलेल्या शैक्षणिक कार्याचा आढावा घेऊन त्यांना श्री चिंतामणी पारसकृपा शहरी व ग्रामीण विकास संस्था परभणी च्या वतीने प्रमोद अंभोरे यांना "राष्ट्रीय एकात्मता गौरव पुरस्कार- 2023" हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

      हा पुरस्कार वितरण सोहळा दिनांक 16 जुलै 2023 वार रविवार रोजी दुपारी 2:30 वाजता शहरातील हॉटेल ग्रीन लिफ, जि.प. कन्या प्रशाला समोर येथे आयोजित करण्यात आला आहे हा पुरस्कार माता रमाबाई आंबेडकर शिक्षण प्रसारक मंडळ परभणी सचिव प्रमोद अशोकराव अंभोरे यांना जाहीर झाल्या बद्दल त्यांच्यावर विविध क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या