🌟तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार-2022 साठी नामांकन प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन....!


🌟असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले आहे🌟

परभणी (दि.07 जुलै 2023) : तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार सन 2022 साठी प्राप्त होणारी नामांकने प्रस्ताव केंद्र शासनाच्या पत्रात नमुद केल्यानुसार दि. 15 जून, 2023 ते दि. 14 जुलै, 2023 या कालावधीतच केंद्र शासनाच्या (https://awards.gov.in/) ऑनलाईन पोर्टलवर स्वीकारण्यात येणार आहेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी प्रस्ताव सादर करावेत असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले आहे.

तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार 2022 करीता केंद्र शासनास शिफारस करण्यासाठी पुढीलप्रमाणे खेळाडूंची कामगिरी / कागदपत्रे असणे आवश्यक आहे. नामांकन सादर करणाऱ्या खेळाडूंची कामगिरी मागील तीन वर्षामधील म्हणजे सन 2020, 2021 व 2022 मधील असणे आवश्यक आहे. साहसी उपक्रम हे जमीन, पाणी व हवेमधील असणे आवश्यक आहे. खेळाडूंची कामगिरी अतिउत्कृष्ट असणे आवश्यक आहे. तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार सन 2022 करीता नामांकने प्रस्ताव केंद्र शासनास सादर करण्याबाबत सुचना दिलेल्या आहेत....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या