🌟या मोर्च्याच्या तयारीची आढावा बैठक औरंगाबाद शास्कीय विश्रामगृह येथे पार पडली🌟
औरंगाबाद (दि.14 जुलै 2023) - मुंबई येथील विधान भवनावर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आयोजित गायरान जमीन व अतिक्रमित जमिनीवर असलेले घरे नावावर करण्यात यावे व अतिक्रमण काढण्यात येऊ नये यासाठी वंचित बहुजन आघाडीचे मा.खा.ॲड.श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात दि.20 जुलै 2023 रोजी भव्य मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्च्याच्या तयारीची आढावा बैठक औरंगाबाद शास्कीय विश्रामगृह येथे पार पडली. बैठकीला मुख्य मार्गदर्शक मा. अशोक सोनोने निमंत्रक तथा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष भारिप बहुजन महासंघ उपस्थित होते. ते म्हणाले सध्याचे सरकार एकमेकांचे उणे दुणे काढण्यात व्यस्त आहे. जण सामान्यांच्या प्रश्नाविषयी त्यांना काहीच देणे घेणे नाहीं.सद्य स्थितीत ऍड. बाळासाहेब आंबेडकर गायरान जमीन,अतिक्रमनीत घरे, झोपडपट्ट्या वाचवीण्यासाठी लढत आहेत.
महाराष्ट्रात 2,22153 गायरान जमीन धारक आहेत तर औरंगाबाद जिल्यात 24513 आहेत पैकी 483 नियमाकुल झाले आहेत.ह्या सगळ्यांसाठी मुबंईच्या मोर्चाचा कॉल दिला आहे.सकाळी 10वाजता राणीच्या बागेपासून मोर्चाला सुरुवात होईल आणि महाराष्ट्र विधानभवनावर धडकेल अगदी शिस्तीत मोर्चा पार पडेल.कार्यकर्त्यांना स्वतःची लीडरशिप डेव्हलप करण्याची ही नामी संधी आहे. कार्यकर्त्यांना कासव गतीने काम न करता अश्वगतीने काम करणे गरजेचे आहे.आत्म चिंतन करणे गरजेचे आहे.ज्या प्रमाणे मुंगी आपल्या वजनाचे 44पट वजन घेऊन एका लाईनीत भिंतीवर चालून आपले लक्ष पूर्ण करते. जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवणं गरजेचे आहे सत्ता, संपत्ती,आणि सौंदर्य कोणाकडेही टिकून राहत नाहीं.पक्षात मोठ्याप्रमाणात इन कमिंग चालू आहे माजी खासदार, आमदार, जीप अध्यक्ष, सभापती आणि बहुसंख्य नेते प्रवेशाच्या तयारीत आहेत. सामान्य कार्यकर्त्यांना सत्तेत बसण्याचे स्वप्न बाळासाहेब आंबेडकर यांना पूर्ण करायची इच्छा आहे. येणाऱ्या 2024मध्ये वंचित बहुजब आघाडी सत्तेत असनारा प्रमुख पक्ष असेल ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे असे ते म्हणाले.
यावेळी राजेंद्र पातोडे, अमितभाऊ भुईंगड, प्रभाकर बकले, योगेश बन, सतीश गायकवाड उपस्तित होते.प्रस्तावना श्याम भारसाकळे यांनी तर आभार रुपचंद गाडेकर यांनी मानले.यावेळी जलीस अहमद, संदीप जाधव, अप्सर पठाण प्रा. भारत सिरसाट,के के जगताप, संघराज धम्मकीर्ती,मुक्तार सय्यद, सिद्धार्थ तेजाड,अंजन भाऊ साळवे, एस पी हिवराळे, दादाराव लोखंडे पाटील,माणिक जगताप, सिद्दार्थ मोरे, मनोहर जगताप, शालिक शेळके, सतीश महापुरे, सिद्धार्थ बनकर,मेघानंद जाधव, प्रवीण जाधव,बाबासाहेब दुशिंग,अशोक खिल्लारे, श्याम जाधव, विलास भिसे, सतीश निकम,बाबासाहेब वक्ते,पी के दाभाडे,भाऊराव गवई,जितेंद्र भवरे,रवि रत्नपारखे,एस पी मगरे, सुरेश भालेराव,उपस्थित होते या मोर्चास जास्तीतजास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडी औरंगाबाद जिल्हा प्रसिध्दी प्रमुख भाऊराव गवई यांनी केले आहे....
0 टिप्पण्या