🌟भारताची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे ही अभिमानाची नव्हे तर चिंतेची बाब - सुभाष राठौड सेवा निवृत्त पो.अधिकारी


🌟लोकसंख्येत पुर्वी जगात चिनचा प्रथम क्रमांक होता आज भारत देश लोकसंख्या वाढीत प्रथम क्रमांकावर🌟

जागतिक लोकसंख्या दिन विशेष -

 'परखड सत्य' लेखक सुभाष राठौड़ 

भारताची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे ही अभिमानाची नव्हे तर चिंतेची बाब आहे.आज बुधवार दि.११ जुलै विश्व जनसंख्या दिवस असल्यामुळे आम्ही भारतीयांना विश्व जनसंख्या दिनाच्या शुभेच्छा द्यायच्या तरी कशा ? कारण जनसंख्या वाढीमुळे भारताला अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.विश्व जनसंख्या दिनाच्या शुभेच्या देतांना आज मनाला तिव्र दुःख अन् वेदना देखील होत आहे भारताला स्वातंत्र्य मिळतांना सन १९४७ या सालात भारताची जनसंख्या ३३ कोटी इतकी होती परंतु आता सन २०२३ या वर्षी जनसंख्येत प्रचंड प्रमाणात वाढ होत भारताची जनसंख्या आज १४० कोटी झालेली आहे त्यामुळे भारताला अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.


लोकसंख्येत पुर्वी जगात चिनचा प्रथम क्रमांक होता आज भारत देश लोकसंख्या वाढीत प्रथम क्रमांकावर आलेला आहे भारतातील लोकसंख्या वाढीमुळे उद्भवणाऱ्या समस्यांवर जनजागृती करण्यात आमच्या देशातील प्रशासकीय यंत्रना तसेच संत महात्म्यांसह सामाजिक संघटना देखील कुठेतरी कामी पडत असल्याचे निदर्शनास येत आहे असे म्हणने निश्चितच चुकीचे ठरणार नाही आजच्या या लोकसंख्या वाढीच्या समस्येमुळे एकमेकांवर नियंत्रण राहिलेले नाहीं पोलिस प्रशासनासह न्यायपालिकेचे देखील काम वाढल्याचे निदर्शनास येत आहे.परंतु या देशाचे दुर्दैवच म्हणावे लागेल की जनसामान्यांच्या मतांवर निवडून येणाऱ्या देशातील लोकप्रतिनिधींना वाढत्या लोकसंख्या वाढीच्या समस्यांवर कठोर उपाययोजना करण्यासह जनसामान्यांची काम करण्यास वेळ मिळत नाही.

देशातील वाढत्या लोकसंख्येमुळे राजकीय अराजकता देखील निर्माण होत आहे निवडणूकीच्या कारणावरून आपआपसात मारामारी खुना सारखे गंभीर प्रकार देखील घडत आहेत विश्वरत्न महामानव परमपुज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर या भारताला जगात सर्वश्रेष्ठ असे संविंधान दिले त्यांनी निर्माण केलेल्या या संविधानामुळे कोट्यावधी दिन दुबळ्या समाजाला स्वाभिमानाने जगण्याचा आधार दिला लेखणीचा बळावर ऐतिहासिक क्रांती घडवणाऱ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना हेच अभिप्रेत होते का ? आजच्या या परिस्थिती वरून असा प्रश्न उपस्थित होतो देशात आज महिला जेष्ठ नागरिक लहान मुल सुशिक्षित बेरोजगार असो का शेतकरी यांची शासकीय अधिकारी सातत्याने पिळवनुक करीत आहेत परंतु लोकनियुक्त सरकारचे प्रशासनासह प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कुठल्याही प्रकारचे नियंत्रण नसल्याचे निदर्शनासा येत आहे.

महागाई प्रचंड प्रमाणात वाढल्यामुळे सर्व साधारण जनतेचा पैसा बचत होणे तर दुरच उलट महागाईने उच्चांक गाठल्यामुळे गोरगरीब जनता जास्तच हातघाईला आल्याचे दिसत असून त्यांना आरोग्या सुरक्षेसाठी चांगले दवाखाने शिक्षणाची चांगली व्यवस्था तसेच रोजगारांची संधी मिळावी या दृष्टीने उपाययोजनेसह लोकसंख्या नियंत्रणाच्या दृष्टीने शासकीय/प्रशासकीय पातळीवर कठोर उपाययोजनांची देखील आवश्यकता आहे शासना प्रमाणेच सर्वसामान्य जनतेने देखील देशाप्रती आणि समाजाप्रती बांधिलकी जोपासत लोकसंख्या नियंत्रणाच्या दिशेने पाऊल उचलून लोकसंख्या कमी करण्याच्या दृष्टीने 'बाप चुकला ती चुक मुलाने करु नयें' असा निश्चय करीत लोकसंख्या नियंत्रणाला आळा घालण्याची सुरुवात आपल्या स्वतःच्या घरातूनच करायला हवी तरच देशाचे भविष्य खऱ्या अर्थाने उज्वल होईल.... 

जागतिक लोकसंख्या दिनाच्या सर्वांना मनपुर्वक हार्दिक शुभेच्या.....धन्यवाद 

 लेखक : सुभाष राठौड़ 

पुर्व पोलिस अधिकारी महाराष्ट्र पोलिस दल

 महाराष्ट्र संघटक राष्ट्रीय बंजारा परिषद पुसद 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या