🌟औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील 157 विद्यार्थ्यांची कॅम्पस मुलाखतीत निवड....!



🌟पहील्यांदाच मोठ्या प्रमाणात प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांची निवड झाल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन होत आहे🌟

परभणी (दि.08 जुलै 2023) : मुलभूत प्रशिक्षण तथा अनुशंगीक सुचना केंद्र द्वारा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षण घेत असलेल्या 157  विद्यार्थ्यांची कॅम्पस मुलाखतीत नामांकित कंपनीमध्ये नोकरीसाठी निवड करण्यात आली आहे पहील्यांदाच मोठ्या प्रमाणात प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांची निवड झाल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन होत आहे.

 मुलभूत प्रशिक्षण तथा अनुशंगीक सुचना केंद्र द्वारा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यासाठी औरंगाबाद येथील इंडुरन्स सिस्टीम प्रा. ली. कंपनी व संजय टेक्नोप्लास्ट प्रा.ली. कंपनीच्या वतीने कॅम्पस मुलाखतीचे आयोजन 1 जुलै, 2023 रोजी करण्यात आले होते. यात कंपनीच्या सहा प्रतिनीधींनी प्रशिक्षण
संस्थेतील विविध व्यवसायाचे प्रशिक्षण घेत असलेल्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या व 135 विद्यार्थ्यांची निवड करून नियुक्ती पत्र देण्यात आले तर पीपीओ या व्यवसायातील 22 विद्यार्थ्यांची निवड करून नियुक्ती पत्र देण्यात आले आहेत. औद्योगीक प्रशिक्षण संस्थेतील 157 विद्यार्थ्याची नामांकित कंपनीत निवड झाल्याबद्दल संस्थेचे प्राचार्य, शिक्षक व विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या