🌟जिल्ह्यात जुलै अखेरचे ईआर-1 त्रैमासिक विवरणपत्र 31 जुलै पर्यंत सादर करण्याचे आवाहन...!


🌟असे आवाहन सहायक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता हिंगोली यांनी केले🌟 

हिंगोली (दि.14 जुलै 2023) : सर्व शासकीय,निमशासकीय कार्यालये तसेच खाजगी आस्थापनांनी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र हिंगोली यांच्याकडे आपल्या आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांची माहितीबाबतचे माहे जून,2023 अखेरचे ईआर-1 त्रैमासिक विवरणपत्र www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर दि. 31 जुलै, 2023 पर्यंत ऑनलाईन भरावेत. माहे जुलै, 2023 ची मासिक वेतन देयके दाखल करताना ईआर-1 भरुन दिल्याचे ऑनलाईन प्रमाणपत्र देयकासोबत जोडणे आवश्यक आहे. याशिवाय मासिक वेतन देयके व इतर कोणतेही देयके स्वीकारले जाणार नाहीत याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.

तसेच सर्व कार्यालयांना जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,हिंगोली  या कार्यालयामार्फत युजर आयडी व पासवर्ड यापूर्वीच कळविण्यात आलेले आहेत. त्यानुसार सर्व कार्यालयानी आपला ई-मेल पत्ता, दूरध्वनी क्रमांक, पत्ता, टॅन क्रमांक, पॅन क्रमांक टाकून आपली प्रोफाईल अपडेट करावी, असे आवाहन सहायक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, हिंगोली यांनी केले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या