🌟या वर्षी देखील मुलींनीच निकालात मारली बाजी🌟
✍️मोहन चौकेकर
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल (SCC Result) जाहीर झाला आहे दहावीच्या परीक्षेत १५ लाख २९हजार ९६ विद्यार्थ्यांपैकी ९३.८३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यात कोकण विभागातील ९८.११टक्के असे सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर नागपूर विभागाचा ९२.०५टक्के असा सर्वात कमी आहे. पुणे विभागातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी ९५.६४ टक्के इतकी आहे.
🌟कुठे पाहाल निकाल ?
www.mahresult.nic.in
http://sscresult.mkcl.org
https://ssc.mahresults.org.in
www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल. www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.
🌟असा पाहा निकाल :-
स्टेप १) दहावी बोर्डाचा निकाल पाहण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in वर जा.
स्टेप २) दहावी निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
स्टेप ३) तुमचा रोल नंबर आणि जन्मतारीख आणि आवश्यक माहिती भरा.
स्टेप ४) दहावीचा निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
🌟 विभागवार निकाल :-
* कोकण : 98.11 टक्के
* कोल्हापूर : 96.73 टक्के
* पुणे : 95.64 टक्के
* मुंबई : 93.66 टक्के
* औरंगाबाद : 93.23 टक्के
* अमरावती : 93.22 टक्के
* लातूर : 92.67 टक्के
* नाशिक : 92.22 टक्के
* नागपूर : 92.05 टक्के
🌟निकालाची वैशिष्ट्ये :-
राज्याचा दहावीचा निकाल 93.83 टक्के पुनरपरिक्षार्थींचे उत्तीर्णतेचे प्रणाम 60.90 टक्के खाजगी विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णतेचे प्रणाम 74.25 दिव्यांगाच्या उत्तीर्णतेचे प्रणाम 92.49 टक्के राज्यात सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा 98.11 टक्के एकूण 25 विषयांचा निकाल 100 टक्क्यांपेक्षा जास्त.मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 3.82 टक्क्यांनी जास्त.राज्यातील 5,26210 विद्यार्थ्यी प्रथम श्रेणीत, 3,34,015 द्वितीय श्रेणीत तर 85218 उत्तीर्ण.14 जूनला विद्यार्थ्यांना गुणपत्रिका शाळेत उपलब्ध होतील यावर्षी दहावीचा निकाल 93.83 , मागीलवर्षी तो 96.94 टक्के होता. याचा अर्थ मागील वर्षीपेक्षा 3.11 टक्क्यांनी निकाल घटला 2020 मधील निकालाशी तुलना करता यावर्षीचा निकाल 1.47 टक्के....
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या