🌟शैक्षणिक वर्ष 2023-2024 साठी विहित नमुन्यातील अर्ज परिपूर्ण भरुन दि. 21 जून, 2023 पर्यंत सादर करावेत🌟
हिंगोली (दि.20 जुन 2023) : महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाकडून दि.16 मार्च 2016 च्या शासन निर्णयान्वये अनुसूचित जमातीच्या दहा विद्यार्थ्यांना परदेशात पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे परदेशात शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्तीचा लाभ मिळण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहे.
विहित नमुन्यातील अर्ज प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, नवीन बसस्थानकाच्या समोर, कळमनुरी जि.हिंगोली येथे उपलब्ध आहेत. शैक्षणिक वर्ष 2023-2024 साठी विहित नमुन्यातील अर्ज परिपूर्ण भरुन दि. 21 जून, 2023 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, कळमनुरी जि.हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे......
0 टिप्पण्या