🌟परभणी जिल्ह्यातील दिव्यांगांसाठी मोफत प्रशिक्षण ; ५ जुलै पर्यंत अर्ज करा....!


🌟यासाठी १८ ते ४० वयोगटातील दिव्यांग पात्र🌟 

 परभणी (दि.९ जुन २०२३): दिव्यांग कल्याण आयुक्तालय, पुणे यांच्यामार्फत शासन मान्यताप्राप्त तुळजाभवानी अपंग प्रशिक्षण केंद्र, देगलूर येथे शिवण, केशकर्तन, कॉम्प्युटर, अकॉउंटींग व ऑफीस ऑटोमेशन व वेल्डर-कम-फॅब्रीकेटर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू आहे. 

यासाठी १८ ते ४० वयोगटातील दिव्यांग पात्र असून, येथे निवास व जेवणाची मोफत सोय आहे. तरी इच्छुकांनी ५ जुलै २०२३पर्यंत वरील पत्त्यावर पत्रव्यवहार करावा किंवा समक्ष भेटावे, अधिक माहितीसाठी ९९६०९००३६९, ९४०३२०७१००, ७३७८६४११३६ आणि ९४२०८४६८८७ वर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या