🌟परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यात अन्नदाता शेतकऱ्याची पुन्हा अंव्हेलना : पाण्या अभावी ऊसाची होतेय अक्षरशः चिपाट...!


🌟बी ५९ चारीला पाणी सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी🌟

परभणी (दि.०५ जुन २०२३) - परभणी जिल्ह्यातील पाथरी शेतकऱ्यांचे आस्मानी संकटां सोबतच शासन,प्रशासन रुपी सुलतानी संकट ही पिच्छा सोडत नसल्याची भावना शेतक-यां मधून व्यक्त होतांना दिसत असून खरीप आणि रब्बी पिकांचे दर कोसळलेले असतांना आता ऊस पिकातुन दोन पैसे मिळऊन किमान घरगाडा चालेल ही प्रामाणिक अपेक्षा ठेऊन मोठा खर्च केलेले ऊसाचे पिक एका पाण्या अभावी मोठी मेहनत आणि खर्च केलेल्या ऊसाचे पिक डोळ्या देखत करपुन जात या ऊसाचे चिपाड होतांना दिसत असुन बी ५९ चारीने जायवाडीचे पाणी मिळवण्या साठी या भागातील शेतकरी आता आंदोलनाच्या पवित्र्यात दिसुन येत आहेत.

एकी कडे शासन शेती मालाची आयात करत आहे त्या मुळे कापुस आणि सोयाबीन चे भाव उतले आहेत.मोठा खर्च करुन पिकवलेल्या मालाला कवडी मोल किंमत मिळत असतांना ऊस पिकातुन चार पैसे मिळतील ही अपेक्षा शेतक-यांना होती. या पिका साठी शेत मशागती सह बेने,लावड,खत,खुरपणी,फवारणी,पाणी देण्या साठी मोठा खर्च शेतकरी करतात.या पिकातुन एक रकमी चार पैसे मिळत असल्याने बारमाही पाण्याची व्यवस्था असणारे शेतकरी ऊसाची लागवड करून अर्थीक दृष्ट्या पिळून निघतात त्या नंतर ऊस पिळून साखर होते. जायवाडी  धरणात मुबलक पाणी असतांना ही प्रशासनातील झारितिल शुक्राचार्यांच्या नियोजना अभावी मोठी मेहनत केलेल्या उभ्या ऊसाचे चिपाड होतांना शेतक-यांच्या डोळ्यात मुकअश्रु येतांना दिसत आहेत.

बी ५९ चारी वर देवनांद्रा,बांदरवाडा,रामपुरी,खेर्डा,ढालेगाव,पाथरी,बाभळगाव,सारोळा,पिंपळगाव,वाघाळा फुलारवाडी,कान्सूर, लोणी बु. तुरा,गुंज,गौंडगाव, मुदगल, लिंबा, विटा, टाकळगव्हाण, जैतापुरवाडी, कान्सुर, तारुगव्हाण ही पाथरी तालुक्यातील गावे ओलिता खाली येतात तर मानवत तालुक्यातील वझुर,थार वांगी,कुंभारी या गावांची शेती ओलीता खाली येते. मात्र पाथरी येथील जायकवाडीच्या उपविभागिय अधिकारी कार्यालयाच्या गलथान कारभाराचा फटका शेतक-यांना बसत असुन येथील नियोजन शुन्य कारभाराचा अनुभव शेतकरी वारंवार घेत आहेत. सर्वाधिक क्षेत्र बी ५९ या चारीवर असतांना जाणिव पुर्वक विलंबाने पाणी सोडून शेतक-यांचे अर्थिक नुकसान करत असल्याची भावना शेतकरी व्यक्त करत आहेत. 

एकी कडे राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि त्यांचे अख्खे मंत्रीमंडळ हे शासन सर्वसामान्यांचे आणि शेतक-यांचे असल्याची टिमकी वाजवत असतांना पाथरी तालुक्यातील वरील गावचे शेतकरी जायकवाडीच्या पाण्या साठी मुक आक्रोश करतांना दिसत आहेत. या विषयी शेतकरी अधिका-यांना विचारणा करत असतांना अधिकारी कर्मचारी उडवा उडवीची उत्तरे देत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.शेतक-यांच्या या प्रश्नावर सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील तालुका स्तरावरील नेते ही चकार शब्द ही काढत नसल्याने आता एक दोन दिवसात या बी ५९ चारीला पाणी नाही आले तर पाथरी येथील जायकवाडीच्या उपविभागिय कार्यालयाला ऊस उत्पादक शेतक-यांच्या मोठ्या रोशाला सामोरे जावे लागणार असल्याचे चित्र दिसुन येत आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या