🌟पुर्णा नगर परिषद प्रशासनाने कचरा वाहतूकीसाठी खरेदी केलेल्या दोन ट्रॅक्टरच्या बॅटऱ्या चोरी ?


🌟नगर परिषदेच्या नवीन ट्रॅक्टरांचे उद्घाटनापुर्वीच चोरट्यांनी केले बॅटऱ्या चोरुन उद्घाटन ?🌟


पुर्णा (दि.१७ जुन २०२३) - पुर्णा नगर परिषद प्रशासनाने शहरातील कचरा वाहतूकीसाठी नव्याने खरेदी केलेल्या दोन मिनी ट्रॅक्टरच्या एक्साईज कंपनीच्या १२ हजार रुपयांच्या बॅटऱ्या नवीन ट्रॅक्टरचे उदघाटन होण्यापुर्वीच दि.१५ जुन ते १६ जुन २०२३ च्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी सिसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या साक्षीने वॉचपेन प्रभु बोकारे हे कर्तव्यावर कार्यरत असतांना देखील नगर परिषदेच्या प्रांगणातून संरक्षण भिंत व लोखंडी गेट ओलांडत चोरी केल्याची गंभीर घटना घडली असुन या घटने संदर्भात बेजवाबदार मुख्याधिकारी युवराज पोळ यांच्यासह नगर परिषदेतील अन्य अधिकाऱ्यांनी अद्यापही गुन्हा दाखल केला नसल्यामुळे संबंधित बॅटऱ्या चोरणारे चोरटे अज्ञात आहेत की नगर परिषदेला ज्ञात आहेत ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पुर्णा नगर परिषदेने संपूर्ण मराठवाड्यात घोळांमध्ये अव्वल दर्जा प्राप्त केलेला असून यापुर्वी देखील नगर परिषदेतील अधिकारी/कर्मचाऱ्यांनी जुन्या नगर परिषद इमारतीतील जुने भंगार साहित्यासह पाणीपुरवठा योजनेतील लाखो रुपयांचे भंगार साहित्य परस्पर खपवून विकल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला होता यासह बोगस पावती बुक छापून गाळे धारकांकडून लाखो रुपयांची वसूली करण्याचा गंभीर प्रकार घडला होता त्यामुळे सदरील ट्रॅक्टर बॅटऱ्या चोरी प्रकरणात देखील एखादा झारीतील शुक्राचार्य तर नाही ? प्रश्नात गुरफटलेल्या नगर परिषद प्रशासनाने चोरीची घटना उघडकीस येवून चोवीस घंटे उलटल्यानंतर देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला नसल्याचे निदर्शनास येत असल्यामुळे पुर्णा नगर परिषद मुख्याधिकारी पोळ नगर परिषदे अंतर्गत होणारे घोळ थांबवण्यात यशस्वी होतील काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे......     

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या