🌟महाराजस्व अभियान अंतर्गत 'शासन आपल्या दारी' या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ…!


🌟गंगाखेड विधानसभेचे लोकप्रिय व कार्यसम्राट आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या शुभहस्ते करण्यात आला शुभारंभ🌟


शासकीय योजना आणि कामे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावीत तसेच प्रशासकीय कारभार सुलभ व गतिमान व्हावा अशा हेतूने महाराजस्व अभियान अंतर्गत 'शासन आपल्या दारी' या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ गंगाखेड विधानसभेचे लोकप्रिय व कार्यसम्राट आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.शिंदे-फडणवीस सरकार गतिमान पध्दतीने काम करीत आहे. सर्व समाज घटकांचा विचार करून ध्येय-धोरणे राबवित आहेत. त्यामुळे शासन आणि जनता यांच्यात संवाद वाढावा म्हणून 'शासन आपल्या दारी' हा उपक्रम हाती घेतला आहे. त्यातून खऱ्या लाभार्थ्यांना लाभ मिळेल, असा विश्वास आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी व्यक्त केला.

शहरातील कापसे गार्डन येथे संपन्न झालेल्या या भव्य कार्यक्रमास जिल्हाधिकारी श्रीमती.आंचल गोयल, उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार प्रदीप शेलार,गटविकास अधिकारी अंकुश चव्हाण, तालुका कृषी अधिकारी प्रभाकर बनसावडे, नगर परिषद मुख्य अधिकारी तुकाराम कदम, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती साहेबराव भोसले, उपसभापती संभाजीराव पोले,जिल्हा संपर्कप्रमुख संदीप माटेगावकर, विधानसभा अध्यक्ष कृष्णाजी सोळंके, माजी पंचायत समिती सदस्य लक्ष्मण आप्पा मुंडे, नितीन बडे, संचालक माणिकराव आळसे, शहर कार्याध्यक्ष इकबाल चाऊस, माझी उपनगराध्यक्ष राधाकिशन शिंदे, तालुकाध्यक्ष बालासाहेब लटपटे, वैजनाथ टोले,माजी नगरसेवक सत्यपाल साळवे, सुमित कामत, उद्धव शिंदे, संजय पारवे, सतीशराव घोबाळे, भास्कर ठावरे, खालेद शेख, सैफ चाऊस यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी, कार्यकर्ते, लाभार्थी, व्यापारी, शिक्षक, पत्रकार, महिला, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या