🌟महाराष्ट्रातील चौदा जिल्ह्यातील रेशन अन्नपुरवठा बंद करण्याचा निर्णय....!


🌟या निर्णया विरोधात विरोधात तीव्र आंदोलन छेडणार : कॉम्रेड राजन क्षीरसागर यांची पत्रकार परिषदेत माहिती🌟


परभणी (दि.१७ जुन २०२३) - परभणी शहरातील स्टेडियम कॉम्प्लेक्स येथील अतिथी सभागृहात आज शनिवार दि.१७ जुन २०२३ रोजी किसान सभेचे राज्य सरचिटणीस कॉम्रेड राजन क्षीरसागर यांच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या पत्रकार परिषदेत माहिती देताना कॉम्रेड राजन क्षीरसागर म्हणाले की महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यातील रेशन पुरवठा केंद्र सरकार आणि राज्य सरकारने  बंद करून राशन कार्ड लाभधारकाना रोख रक्कम देण्याचा शासन निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्र शासनाने घेतलेला हा निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी रेशन बचाव समिती आणि अन्न अधिकार अभियान कार्ड धारक लाभार्थी , रेशन दुकानदार हमाल माधाडी कामगार , शेतकऱ्यांच्या  वतीने महाराष्ट्र भरात चरणबद्ध पध्दतीने  , प्रचंड मोर्चे , विधी मंडळावर आंदोलन , धरणे आंदोलन , तीव्र रेले रोकोआंदोलन  करण्यात येणार असल्याची माहिती कॉम्रेड राजन क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या