🌟१ जुलै २०२३ रोजी विशेष शिबिराचे आयोजन करून सर्व लाभ देण्याचे निर्देश🌟
दिव्यांग कल्याण विभागाकडून ‘दिव्यांगांच्या दारी’ हे अभियान राबविण्यासाठी महात्मा गांधी सेवा संघाचे सचिव विजय कान्हेकर यांनी एसओपी तयार करण्याबाबत चर्चा केली. तसेच प्रामुख्याने दिव्यांगांना ओळखपत्र देणे, शेत जमिनीशी संबंधित कागदपत्रे जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, शिधापत्रिका, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, नॉन क्रिमीलेअर, अधिवास प्रमाणपत्र इत्यादी महसुली व इतर कागदपत्रे एकाच छताखाली देण्यासाठी १ जुलै २०२३ रोजी विशेष शिबिराचे आयोजन करून सर्व लाभ देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दिव्यांग कल्याण विभाग ‘दिव्यांगांच्या दारी’ हे अभियान प्रत्येक जिल्ह्यात राबविण्यासाठी २३ मे २०२३च्या शासन निर्णयानुसार आमदार बच्चू कडू यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती गठीत करण्यात आली असून, ते मुख्य मार्गदर्शक आहेत. या अभियानाची सुरुवात ७ जून २०२३ रोजी मुंबई येथून करण्यात आली असून प्रत्येक जिल्ह्यात हे अभियान राबविताना जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
या समितीमध्ये जिल्हाधिकारी हे अध्यक्ष असून, मुख्य कार्यकारी अधिकारी, महानगर पालिकेचे आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक, नगरपालिकेचे मुख्याधिकारी, अधिष्ठाता, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी हे सदस्य असून, जिल्हा समाज कल्याण अधिकारी हे समितीचे सदस्य सचिव आहेत. जिल्हा समाज कल्याण अधिकारी तथा सदस्य सचिव शिवानंद मिनगीरे यांनी उपस्थित सर्व अधिकारी व दिव्यांग संघटनांचे प्रतिनिधी यांचे आभार मानले. जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या हस्ते सय्यद हुसेन, राहुल शिवभगत, विजय कान्हेकर यांच्यासह दिव्यांग शाळेतील सर्व विशेष शिक्षक तालुका समन्वयक तसेच वैद्यकिय सामाजिक कार्यकर्ता या पदावर नव्याने रुजू झालेले दिव्यांग कल्याण विभाग प्रमुख प्रल्हाद लांडे यांचा सत्कार करण्यात आला.....
0 टिप्पण्या