🌟प्रा.नितीन नरवाडे यांच्या अकाली निधनामुळे पूर्णा शहरावर पसरली शोककळा...!


🌟दिवंगत प्राध्यापक नितीन नरवाडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली विनम्र अभिवादन🌟

पुर्णा (दि.१६ जुन २०२३) - पुर्णा शहरातील आंबेडकरी व धम्म चळवळी तील अभ्यासू युवा व्यक्तिमत्व प्रा.नितीन नरवाडे यांचे अल्पशा आजाराने नांदेड या ठिकाणी दि.15 जुन ला दुपारच्या वेळी दवाखान्यामध्ये उपचारादरम्यान दुःखद निधन झाले.

सामाजिक धार्मिक शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये आपल्या कर्तुत्वाचा आगळावेगळा ठसा त्यांनी उमटविला.डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका बुद्ध विहार पूर्णा या ठिकाणी मार्गदर्शकाच्या भूमिकेतून विद्यार्थी विद्यार्थिनी ना त्यांनी मार्गदर्शन केले.भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान बुद्धसार्वजनिक जयंती मंडळ राबवीत असलेल्या व्याख्यानमाला प्रबोधन कार्यक्रमाचे ते उत्कृष्ट सूत्रसंचालन करत असत.

बुद्ध विहार पूर्णा या ठिकाणी संपन्न होणारे विविध प्रबोधनाचे कार्यक्रम वंदनीय भिकू संघाची धम्मदेशना पौर्णिमेचे कार्यक्रम महापुरुष समाज सुधारकांच्या जयंती स्मृती दिनाचे सूत्रसंचालन ते करत असत.पंचशील नाट्य ग्रुपचे ते क्रियाशी ल संस्थापक सदस्य होते.पंचशील नाट्य ग्रुपचे प्रमुख आदरणीय बंडू गायकवाड यांच्या खांद्याला खांदा लावून पंचशील नाट्यगृह नावरुपास आणले प्राध्यापक नितीन नरवडे सारखे समर्पित सेवाभावी वृत्तीने कार्य करणारे सदस्य असल्यामुळे संपूर्ण मराठवाड्यामध्ये पंचशील नाट्य ग्रुप चा काराकीर्द  चा आलेख चढता राहिला आहे.

अखिल भारतीय भिक्कु संघाचे महाराष्ट्र शाखेचे महासचिव पूज्य भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांच्या विषयी व भिकू संघाविषयी त्यांच्या मनामध्ये नितांत आद राची भावना होती. अगदी पंधरा-वीस दिवसा अगोदर त्यांनी माझ्यासोबत अनौपचारिक चर्चा करताना मला ते म्हणाले पूजा भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांचं कार्य खूप महान आहे देश विदेशात त्यांचं धम्म कार्य पोहोचल आहे.

पंचशील नाट्य ग्रुपचे बंडू गायकवाड आणि आपण भंतेजींच्या धम्म कार्यावर आधारित डॉक्युमेंटरी फिल्म तयार करूया.बंडू दादा यांना या मधला खूप अनुभव आहे.पूर्ण महाराष्ट्र मध्ये ही फिल्म तयार झाल्यानंतर त्याचा आपण प्रसारण करूया.यावरून त्यांची भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांच्या विषयी अगाध श्रद्धा दिसून येते कमालीची त्यांच्यामध्ये मंगल मैत्रीची भावना होती सर्व जातीधर्मामध्ये त्यांचा मोठा मित्रपरिवार आहे.

त्यांचं अकाली जाण म्हणजे आंबेडकरी व धम्म चळवळीची परिवर्तन  चळवळीची फार मोठी हानी आहे. अतिशय शोकाकुल वातावरणामध्ये दिनांक 16 ला सकाळी अकरा वाजता बौद्ध स्मशान भूमीमध्ये भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो भदंत पयावांश यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी सामाजिक धार्मिकराजकीय शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रामधील मान्यवर आप्तेष्ट नातेवाईक मित्रपरिवार यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

या डोंगरा एवढ्या दुःखा मधून सावरण्याच सामर्थ्य कुटुंबीय आप्तेष्ट नातेवाईक व मित्रपरिवार यांना प्राप्त हो वो ही मनोकामना बुद्ध विहार समिती भारतीय बौद्ध महासभा तालुका व शहर शाखा पूर्णा धम्म सेवेमध्ये कार्यरत असलेली सर्व महिला मंडळ सामाजिक राजकीय शैक्ष णिक क्षेत्रामधील सामाजिक बांधिलकीच्या भूमिकेतून कार्य करणारे सर्वांच्या वतीने दिवंगत प्राध्यापक नितीन नरवाडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली विनम्र अभिवादन....

अभी वादक

श्रीकांत हिवाळे सर

अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा ता. पूर्णा जी.परभणी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या