🌟वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे संचालक धर्मराज गोखले (कृषी) यांचे प्रतिपादन🌟
केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे नांदेड येथील केंद्रीय संचार ब्यूरो व वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने, कृषी महाविद्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ येथे आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विशेष प्रचार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्या प्रसंगी डॉ. गोखले बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर अरविंद जोशी, विभागीय वन अधाकारी, परभणी, डॉ. इस्माईल, प्राचार्य, कृषी महाविद्यालय, डॉ. जया बंगाळे, प्राचार्य सामुदायिक विज्ञान महाविद्यालय, डॉ. सचिन मोरे, विद्यार्थी कल्याण अधिकारी, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी, वन विभागाचे आर.एफ.ओ. ऋषिकेश चव्हाण व प्रकाश शिंदे, क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाये, केंद्रीय संचार ब्यूरो नांदेड व सहायक क्षेत्रीय प्रचार अधिकारी सुमित दोडल आदी मान्यवर उपस्थित होते.
अमर्याद प्लास्टिकच्या वापरामुळे मानवाबरोबर इतर घटकांवरही परिणाम होत असून, प्लास्टिकच्या वापरावर व उत्पादनावर मर्यादा आणण्याची गरज व्यक्त करुन, कृषी विद्यापीठात होत असलेल्या पर्यावरण अनुकूल, वृक्ष लागवड, स्वच्छता कार्यक्रमाची माहिती डॉ. गोखले यांनी दिली तत्पूर्वी कुलगूरु डॉ. इंद्रमणि यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमात सहभागी होवून पर्यावरणाच्या निरंतर संवर्धन आणि संरक्षणासाठी प्रत्येक दिवस हा पर्यावरण दिवस म्हणून पाळावा असे आवाहन केले.
विभागीय वन अधिकारी अरविंद जोशी यांनी वन विभागाच्या वतीने परभणी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवडीचा कार्यक्रम घेण्यात आला असून, वन विभागाच्या वतीने पुरेशा प्रमाणात मोफत रोपांचा पुरवठा केला जाणार असल्याचे सांगितले डॉ. इस्माईल यांनी प्लास्टिकच्या अमर्याद वापरामुळे निसर्गाची मोठी हानी होत असून, प्रत्येकांनी प्लास्टिकचा वापर करणे टाळल्यास पर्यावरणाची जोपासना होण्यास मदत होईल असे सांगितले.
क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाये यांनी, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरोच्या कार्याची माहिती देवून, मिशन लाईफ आणि प्लास्टिक वापरापासून होणाऱ्या गंभिर परिणामाची माहिती देवून निसर्गाच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी मिशन लाईफचा आत्मसात करावा असे सांगितले.
पर्यावरण दिनानिमित्त वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगूरु डॉ. इंद्रमणि यांच्या हस्ते वृक्ष लागवडीचा प्रारंभ करण्यात आला. तृणधान्य व पर्यावरण या विषयावर पोष्टर आणि निबंध स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धांमध्ये 200 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या दिनानिमित्त विद्यापीठात स्वच्छता मोहिम हाती घेण्यात आली, केंद्रीय संचार ब्यूरो नांदेडद्वारे पर्यावरण अनुकूल कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले.
शाहीर भारत मुंजे यांनी आपल्या सांस्कृतिक कार्यक्रमातून पर्यावरणाविषयी जऩजागृती केली. मान्यवरांच्या हस्ते निबंध आणि पोष्टर स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांचा पारितोषिक प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्र संचलन डॉ. आर.व्ही. चव्हाण यांनी केले, तर डॉ. रवी शिंदे यांनी आभार मानले......
0 टिप्पण्या