🌟सा.बां.विभागातील अधिकाऱ्यांच्या कुंभकर्णी झोपेला नाही लाज ? भ्रष्ट गुत्तेदार म्हणतो पैश्यापुढ नाचतो प्रत्येक जन आज ?
पुर्णा (दि.३० जुन २०२३) - पुर्णा तालुक्यातील ताडकळस येथील ताडकळस-पिंगळी-परभणी मार्गावर निकृष्ट रस्ता निकृष्ट नाली बांधकामाच्या कामाला वाजत गाजत सुरुवात : सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांच्या कुंभकर्णी झोपेला नाही लाज ? अन् भ्रष्ट गुत्तेदार म्हणतो पैश्यापुढ नाचतो प्रत्येक जन आज ? अशी एकंदर परिस्थिती ताडकळस येथील ताडकळस-पिंगळी-परभणी मार्गावर होत असलेल्या रस्ता नाली बांधकामाची अवस्था बघितल्या नंतर लक्षात येत असून सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत संबंधित कामाचे गुत्ते घेणाऱ्या केटीएल कंपनीने या रस्ता नाली बांधकाच्या अत्यंत दर्जाहीन व निकृष्ट बांधकामाला सुरुवात केली असून सदरील काम अंदाजपत्रकानुसार न करता मनमानी पध्दतीने केले तर जातच आहे त्याही पेक्षा गंभीर बाब म्हणजे या रस्त्याच्या आसपास मागील अनेक वर्षांपासून मडग्या उभारून आपला व्यवसाय चालवत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या अतिक्रमणधारकांना कुठल्याही प्रकारची पुर्व सुचना किंवा नोटीसा न देता संबंधित गुत्तेदार महोदयांनी अतिक्रमण काढण्यास सुरुवात करीत हुकूमशाही पध्दतीचा अवलंब करून या गोरगरीब अतिक्रमण धारकांच्या पोटावर पाय देत त्यांचे नुससान करण्यास सुरुवात केल्यामुळे संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या संदर्भात सविस्तर माहिती अशी की पुर्णा तालुक्यातील ताडकळस मध्ये काही वर्षापासून एक केटीएल नावाची कंपनी रोड व नाली बनवण्याचे काम करत आहे ताडकळस पिंगळी मार्गे परभणी जाणारे रोड अंतर्गत नालीचे काम सुरू झाले व तेथील अतिक्रमण ही काढण्यात आले अतिक्रमण धारकांच्या म्हणण्यानुसार आम्ही तहसीलचा कर भरत होतो आणि अतिक्रमणची कारवाई करण्यापूर्वी त्यांना कोणतीही नोटीस न देता आमचे अतिक्रमण काढले म्हणून आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे तसेच अतिक्रमण धारकाचे म्हणणे आहे दोन्ही बाजूंनी सारखे काम व्हायला पाहिजे कारण ताडकळस येथील पोलीस स्टेशनच्या समोर केटीएल कंपनीचा एक जेसीबी बंद पडलेला आहे त्यामुळे आजच वाहतुकीची कोंडी होत आहे तर रोडच्या दोन्ही बाजूंनी नाल्या झाल्यास वाहतुकीला किती अडथळा होईल त्यामुळे विकास कामाला आमचा कुठलाही विरोध नाही या रोडचे रुंदीकरणाचे काम व्हायला पाहिजे
परंतु असे न होता संबंधित बांधकाम गुत्तेदार कंपनी केटीएल मार्फत धनदांडग्या लोकांपुढे मुजरा केला जातांना दिसून येत असून गोरगरीब व्यापाऱ्यांवर मात्र अन्याय केला जात असल्याची चर्चा रंगलेली आहे संबंधित बांधकाम गुत्तेदार कंपनीकडून सिमेंट नालीचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे केले जात आहे अशी तक्रार होत असल्याने आमच्या प्रसिध्दी माध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष पाहणी केली असता नालीचे काम हे अंदाजपत्रका प्रमाणे न करता सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या तडजोडीनुसार केले जात असल्याचे निदर्शनास आले नाली करण्यासाठी गोरगरिबांच्या पान टपऱ्या व छोट्या मोठ्या व्यवसायांचे शेड ही काढले जात आहे व ज्याचे पक्के बांधकाम आहे त्यांना मात्र खुली सूट देऊन बांधकाम न पाडता चक्क नाली नागमोडी केली जात आहे असं का करता विचारपूस केले असता आम्हाला जिल्हाधिकारी साहेबांचे आदेश आहे की पक्के बांधकाम पाडू नका व तडजोडीनुसार काम करा असे सांगण्यात येत आहे छोट्या व्यापाऱ्यांचे अतिक्रमण काढल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी केलेल्या सर्वे अनुसार असे निदर्शनास आले की संबंधित रोड/नाली बांधकाम करणारी केटीआयएल कंपनी व सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी संगणमताने स्वतःच्या सोईनुसार निकृष्ट दर्जाचे काम करत आहेत कारण अश्या प्रकारे निकृष्ट दर्जाचे काम होत असतांना या कामावर लक्ष देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागातील एखादा जवाबदार अधिकारी किंवा कनिष्ठ अभियंता देखील उपस्थित राहत नसल्यामुळे शंकेची पाल चुकचुकतांना दिसत असून सिमेंट नालीवर टाकलेल्या छतावर आतापासूनच मोठमोठे तडे जाण्यास सुरुवात झाली आहे असून कामावर पाण्याचा वापर देखील मुबलक प्रमाणात होत नसल्यामुळे सदरील कामाची अल्पकालावधीतच संपूर्णतः विल्हेवाट लागण्याची शक्यता असून या संदर्भात कामाच्या साइटवरील जवाबदारी व्यक्तीला विचारले असता तो म्हणाला की आम्हाला पाणी विकत आणावे लागत आहे त्यामुळे पाण्याची कमतरता होत आहे दरम्यान या कामाकडे सा.बां.विभागाचे विश्वास लोहेकर व अभियंता शिंदे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्यामुळे सदरील कामाचा दर्जा खालावल्याचे दिसत आहे.
संबंधित बांधकाम गुत्तेदार कंपनी केटीएल कडून नालीचे काम अत्यंत निकृष्ट व बोगस पद्धतीने केले जात आहे असल्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर याची दखल घेऊन चांगल्या पद्धतीची कामे करावी अशी नागरिकांकडून मागणी करण्यात येत आहे....
0 टिप्पण्या