🌟सामान्य जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही - आमदार संजय शिरसाट


🌟यावेळी आमदार संजय शिरसाट यांनी सातारा परिसरातील भागातील नाल्याची पाहणी केली🌟

संभाजीनगर / (दि.04 जुन 2023) : पश्चिम विधानसभा मतदारसंघात असलेल्या सातारा परिसरातील   तरुण भारत रेल्वेगट ते MIT कॉलेज या सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन तसेच किनकोनबेन नगर येथे खुल्या जागेचे सुशोभीकरण या कामाचे उद्घाटन व  आमदार संजय शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आले तसेच या वेळी आमदार संजय शिरसाट यांनी सातारा परिसरातील भागातील नाल्याची पाहणी केली.


तरुण भारत रेल्वेगट ते MIT कॉलेज हा सातारा -देवळाई-बीड बायपासला जोडणारा मुख्य रस्ता आहे या रस्त्यावरून शहरातील अनेक  भागाचे नागरिक जात येत असतात विविध भागातील नागरिक आप  आपल्या काॅलनीत जाण्यासाठी, आॅफीसला जाण्यायेण्यासाठी  या रोडचा वापर करत असतात, गेल्या काही वर्षांपासून हा रोड अत्यंत खराब झाला होता या भागातून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना पावसाळ्यामध्ये खूप त्रास सहन करावा लागत होता रोड खराब असल्यामुळे नेहमीच अनेक अपघात होत असत त्यामुळे या भागातील नागरिकांनी हा मुख्य रस्ता करावा म्हणून आमदार संजय शिरसाट यांच्याकडे मागणी केली होती या मागणीकडे लक्ष देत आमदार संजय शिरसाट हा रस्ता मंजूर करत नागरिकांची ही मागणी पूर्ण केली व आज आमदार संजय शिरसाट यांनी या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन केले. 


याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, शहर अभियंता देशमुख, उपशहरप्रमुख रमेश बाहुले, राजू राजपूत, सतीश निकम, अशोक गायके, संतोष मरमट, विभागप्रमुख रणजित ढेपे, मनोज सोनवणे, शाखाप्रमुख इश्वर पारखे, युवासेना शहरप्रमुख शुभम काळे, विकास कुबेर, स्वप्निल चंदने, बाळू पारखे,  पंकज अवंडेकर, प्रकाश कुलकर्णी, नितीन भागवतकर, काकासाहेब शिंदे, दीपक शेळके आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

आमदार संजय शिरसाट या वेळी बोलताना म्हणाले की, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  हे खऱ्या अर्थाने सर्व सामान्य जनतेचे काम रात्रंदिवस करत आहे, आज आपल्या रस्त्याला त्यांनीच निधी उपलब्ध करून दिला, पश्चिम विधानसभा मतदार संघात अनेक विकास कामे मोठ्या संख्येने सुरु आहेत, ज्या जनतेने मला आशीर्वाद देऊन निवडून दिले आहे त्या जनतेच्या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ दिला नाही व यापुढेही तडा जाऊ देणार नाही , कारण मी जे काही आहे ते तुमच्यामुळे आहे तुमच्या अडचणी सोडविण्यासाठी मी सदैव कटीबध्द आहे, तुमच्या  अडचणी मला सांगत चला त्या नक्कीच  पुर्ण करून देण्याचा प्रत्यन मी करेल आज या रस्त्याचे भूमिपूजन झाले लगेच कामाला देखील सुरुवात होऊन येत्या काही महिन्यात हा रस्ता पूर्ण झालेला दिसेल असे प्रतिपादन आमदार संजय शिरसाट यांनी केले.....

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या