🌟सर्व वारकऱ्यांना नाष्टा,चाहा देऊन त्यांचे मा.नगराध्यक्ष प्रतापभाऊ देशमुख यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले🌟
जिंतूर प्रतिनिधी / बी.डी.रामपूरकर
जिंतूर (दि.१३ जुन २०२३) - पंढरपूर कडे जाणाऱ्या दिंडीचे स्वागत दरवर्षी प्रमाणे या वर्षी पण करण्यात आले. यंदाचे १६ वर्ष आहे. या ही वर्षी स्वागत करण्यात आले. सकाळी दिंडीचे आगमन झाले सर्व वारकऱ्यांना नाष्टा, चाहा देऊन त्यांचे माजी नगराध्यक्ष प्रतापभाऊ देशमुख यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. तर महिला वारकऱ्यांचे समृद्धी बाळासाहेब देशमुख हिने सत्कार केला. त्यावेळी ह.ब.प. नरहरी वानखेडे महाराज, ह.ब.प. सुरेश मिरासे महाराज, ह.ब.प. रामदास मिलकर महाराज आणि सर्व वारऱ्यांचे स्वागत करण्यात आले. या बाळासाहेब देशमुख, राहुल देशमुख, मुकुंद देशमुख, संतोष आव्हाड, भगवान रेवाळे भानुदास अवचार,रईस व सज्जात आदींनी परिश्रम घेतले.....
0 टिप्पण्या