🌟जिंतूर तालुक्यातील पाचेगाव योगवर्धिनी उपकेंद्रावर आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा....!


🌟योग म्हणजे शरीराचा व्यायाम नसून योग मानवी मन आणि आत्मा यांची क्षमता जाणून घेणाऱ्या विज्ञानाचा एक भाग🌟 

जिंतूर प्रतिनिधी / बी.डी.रामपूरकर


जिंतूर (दि.२१ जुन २०२३) : तालुक्यातील पाचेगाव येथे योगवर्धिनी उपकेंद्रावर अंतर आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग शिबिरास मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरा करण्यात आला. अंतरराष्ट्रीय योग दिना निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. योगा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण नियमित योगासने केल्यास शरीर सशक्त व चपळ आणि लवचिक बनतात त्यांचबरोबर शरीराचे स्नायू बळकट बनतात व शरीराला योग्य प्रकारचे ठेवण तयार होते. योगा करणे हे आपल्या जीवनासाठी खूप महत्त्वाचे आहे परंतु योग करताना योगाची योग्य पद्धत समजून घेऊन योग करणे आपल्या शरीराला फायदेशीर ठरते. योग म्हणजे शरीराचा व्यायाम नसून योग मानवी मन आणि आत्मा यांची क्षमता जाणून घेणाऱ्या विज्ञानाचा एक भाग आहे. योग अभ्यासातून मानवी जीवनशैलीचा परिपूर्ण सारांश प्राप्त होतो. आपल्या शरीरातील आणि मनातील ताणतणाव दूर करायचा असेल तर त्यासाठी योग फायदेशीर ठरतो. योगातील ध्यान प्राणायाम आणि योगासने नियमित केल्यानंतर तणावापासून मुक्ती मिळते असे मत योग शिक्षक बी.डी.रामपूरकर यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे आयोजन आरोग्य विभाग परभणी यांच्या मार्गदर्शनाखाली पाचेगाव येथील आरोग्यवर्धिनी उपकेंद्र करण्यात आले, याप्रसंगी योगवर्धिनी उपकेंद्रातील डॉक्टर येडुलकर टी.बी.,श्रीमतीकविताआडे, सखाराम हुलगुंडे ,निर्मला डोंगरे ,निलाबाई घोडे तर गावचे सरपंच ससे जिल्हा परिषद शाळेचे व्यवहारे, ससे ,विष्णु शिंदे आदी शिक्षक सहभागी झालेले होते त्याचबरोबर अनिल ससे व नागरिक विद्यार्थी मोठ्या संख्येने शिबिरात उस्फूर्तपणे उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या