🌟तहसिलदार बोथीकर यांच्या मार्फत जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी🌟
परभणी/पुर्णा (दि.२७ जुन २०२३) - महाराष्ट्र शासनाने तलाठी भरती संदर्भात जाहिरात काढली असून परिक्षा शुल्क नोंदणी फिस ९००/-रुपयें एससी/एसटी तर खुला प्रवर्गासाठी १०००/-रुपये फिस ठेवण्यात आलेली आहे.शासनाने ठेवलेली ही फिस अतिशय जास्त असून अगोदरच राज्यात वाढत्या बेरोजगारी मुळे सुशिक्षित बेरोजगार त्रस्त असतांना त्यातच मागील काळात कोविड महामारीसह दुष्काळी परिस्थिती महागाई यामुळे जनसामान्य परेशान असतांना तलाठी भरती करीता शासन आकारत असलेले पात्रता परिक्षा शुल्क अत्यंत जास्त आहे.
'सबका साथ सबका विकास' या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेनुसार सर्वांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणे आवश्यक आहे परंतू शासनाच्या अवास्तव फिस मुळे असंख्य गरजू होतकरू तरुण या संधीपासून वंचित राहतील त्यामुळे तात्काळ परिक्षा शुल्क कमी करण्या संदर्भात पावल उचलून सदरील गागणी शासनाकडे पोहोचवावी असे पुर्णा शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने आज मंगळवार दि.२७ जुन २०२३ रोजी तहसिलदार माधव बोथीकर यांच्या मार्फत जिल्हाधिकारी आंचल गोयल यांना पाठवण्यात आलेल्या निवेदनात म्हटले असून या निवेदनावर परभणी जिल्हा काँग्रेस सोशल मिडियाचे जिल्हाध्यक्ष निखील धामणगावे,परभणी जिल्हा काँग्रेस पार्टीचे जिल्हा सरचिटणीस वहिद कुरेशी,नगरसेवक ॲड.हर्षवर्दन गायकवाड,कुंदन ठाकूर,शंकर पुंडगे,सुनिल ठाकूर,नरेंद्र येवले,एस.व्ही.साळवे,शेख अहेमद आदींच्या स्वाक्षरी आहेत.......
0 टिप्पण्या