🌟पुर्णा तालुक्यात पहिल्याच दिवशी मिळणार विद्यार्थ्यांना पुस्तके : विद्यार्थ्यांच्या हातात आता एकच पुस्तक...!


🌟तीन महिन्यांसाठी सर्व विषयांचे एकच पुस्तक विद्यार्थ्यांच्या हाती राहणार🌟 

पुर्णा (दि.१४ जुन २०२३) - पुर्णा तालुक्यातील जिल्हा परिषद आणि खाजगी संस्थेच्या १ ली ते ८ वी वर्गातील २४८८८ हजार विद्यार्थ्यांना १५ जून रोजी शाळेच्या पहिल्याच दिवशी प्रत्येकी ४ पुस्तके मिळणार आहेत.तीन महिन्यांसाठी सर्व विषयांचे एकच पुस्तक विद्यार्थ्यांच्या हाती राहणार आहे.

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मितीच्या वतीने बालभारतीकडून मिळालेल्या नवीन ४ भागातील मराठी व सेमी इंग्रजी माध्यमाचे पुस्तकाचे वितरण गटशिक्षणाधिकारी मारोती सुर्यवंशी यांच्या सनियंत्रणात व पाठ्यपुस्तक विभाग प्रमुख रविंद्र हनुमंते व उमाकांत माने यांचेकडून १० केंद्रामार्फत शाळास्तरापर्यंत केले आहे. या पाठ्यपुस्तकांचे वैशिष्ट्ये म्हणजे यावेळी प्रत्येक वर्गासाठी केवळ ४ भाग नोंदीही घेता येणार वर्षभरात चारच पुस्तके विद्यार्थ्यांला वापरावी लागतील. याशिवाय वेगळी वही आणण्याची गरज नाही. विद्यार्थ्यांना पुस्तकातच गृहपाठ लिहिण्याची सोय केलेली आहे. यातून नोंदी करण्याची सवय विद्याथ्यांना हाईल.

दर तीन महिन्यात एक भाग पूर्ण करणे हे विद्यार्थ्यांसाठी सोयीचे असेच हे नवीन पाठ्यपुस्तक म्हणता येईल. अध्ययन क्षमता विकसित होण्यासाठी या उपक्रमाचा फायदा विद्यार्थ्यांना होईल असे पुर्णा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मारोती सुर्यवंशी यांनी म्हटले आहे

अभ्यासाचा समावेश केला आहे असलेले पुस्तके आले आहेत. व्यवस्था आहे. त्यावरच प्रश्नोत्तरेही लिहिता येणार आहेत. त्यामुळे मुलांना एकच पुस्तके शाळेत न्यावे लागणार आहे. तर वह्या नेण्याची गरज भासणार नाही. दर तीन महिन्याला १ भाग पूर्ण करणे अनिवार्य असणार आहे.

पुस्तकाचा १ भागात तीन महिन्याच्या पाठ्यपुस्तकात स्वाध्याय कोरी पृष्ठ असल्याने वह्यांपासूनही .विद्यार्थ्यांची सुटका होईल. पुस्तकात दिली आहेत. पाठ्यपुस्तक वितरणासाठी गट साधन केंद्र पूर्णा येथील सर्व कर्मचारी सहभागी होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या