🌟परभणीत सिंगल युज प्लास्टिक वापरल्याबद्दल पाच दुकानदारावर मनपाची दंडात्मक कारवाई....!


🌟कच्छी बाजार परिसरामध्ये विशेष मोहीम राबवत प्रत्येकी 5000 याप्रमाणे पंचवीस हजार रुपये दंड वसुलीची कारवाई🌟

परभणी (दि 30 जुन 2023) : सिंगल युज प्लास्टिक वापरल्याबद्दल पाच दुकानदारांवर मनपाच्या पथकाने शुक्रवार दिनांक 30 जून रोजी कच्छी बाजार परिसरामध्ये विशेष मोहीम राबवत प्रत्येकी 5000 याप्रमाणे पंचवीस हजार रुपये दंड वसुलीची कारवाई केली आहे.

परभणी शहरांमध्ये प्लास्टिक बंदी कायद्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे, तरी देखील अनेक जण प्लास्टिक कॅरीबॅगचा व इतर वस्तूंचा वापर करत आहे, त्यामुळे मनपाने शोध मोहीम  हाती घेतली आहे, शुक्रवार दिनांक 30 जून रोजी महापालिका आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या आदेशानुसार मुख्य स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड, कोंडवाडा प्रमुख विनय ठाकूर, न्याय रत्न घुगे, मुकादम दत्ता गव्हाणे, शेख रफिक यांच्या पथकाने कच्छी बाजारात कारवाई करत 75 किलो प्लास्टिक पॉकेट दोन कंटेनर बॉक्स जप्त केले आहेत व 25 हजाराचा दंड लावला आहे.

शहरातील व्यापारी, व्यवसायिक, विक्रेते व नागरिकांनी पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी प्लास्टिकचा वापर करू नये अन्यथा कारवाई करण्यात येईल असा इशारा मनपा आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी दिला आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या