🌟महारेलने जिल्हा पोलिस अधिक्षक रागसुधा आर.यांच्याकडे केली संरक्षणासह हल्लेखोरांवर कठोर कारवाईची मागणी🌟
परभणी (दि.०९ जुन २०२३) - परभणी जिल्ह्यातील पुर्णा शहरातल्या पुर्णा-नांदेड राज्य महामार्गावरील हिंगोली गेट परिसरात रेल्वे क्रॉसिंगवर रेल्वे उड्डानपुलाचे बांधकाम चालत असून या बांधकामाचे गुत्ते महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (एमआरआयडीसी) कडून मुख्य कंत्राटदार डिसीएस राव यांना देण्यात आले होते त्यांच्या मार्फत सदरील कामाचे सब टेंडर गेलकॉन इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि.कंपनीला रेल्वे उड्डाण पुल निर्मितीचे कंत्राट देण्यात आले होते सदरील काम सुरळीतपणे कंपनीकडून चालत असतांना या कंपनी मार्फत काम करणाऱ्या परप्रातांतीय अधिकारी/कर्मचाऱ्यांना असामाजिक तत्वांकडून वेळोवेळी धमक्यांसह हल्ले तसेच जबरदस्तीने बांधकाम साहित्य स्टिल उचलून नेण्यासारख्या विविध संकटांचा सामना करावा लागत असल्यामुळे या संदर्भात कंपनीचे डायरेक्टरांनी एमआरआयडीसी मार्फत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह परभणी जिल्हा अधिकारी यांना देखील यापुर्वी दि.१७ नोव्हेंबर २०२२ रोजी रितसर तक्रार दिली होती परंतु या तक्रारीची वरिष्ठांकडून गंभीर दखल घेतली न गेल्याचा गंभीर परिणाम दि.३ जुन २०२३ रोजी कंपनीचे प्रकल्प अधिकारी त्यागराजन परशुराम यांना भोगावा लागला दि.०३ जुन २०२३ रोजी सकाळी १०-३० वाजेच्या सुमारास नेहमी प्रमाणे मुळ तामीळनाडूचे रहिवासी असलेले प्रकल्प व्यवस्थापक त्यागराजन परशुराम पुर्णा-पांगरा ढोणे रोडवरील बिएसएनएल कार्यालया समोरील कंपनीच्या कार्यालयात कामाचे नियोजन करीत असतांना स्थानिक गुत्तेदार शेख अतिख शेख बशीर यांच्याशी त्यांचा सामानाच्या देवाणघेवाणातून किरकोळ वाद झाल्यावर संबंधित गुत्तेदार व सोबत आलेल्या चार ते पाच लोकांनी त्यांच्यावर सशस्त्र खुनी हल्ला चढवला या हल्यात त्यागराजन परशुराम गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांना सहकारी कर्मचाऱ्यांनी स्थानिक डॉ.वाघमारे हॉस्पिटलमध्ये भरती केले त्यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना नांदेड येथील रुग्नालयात हलवण्यात आले परंतु प्रकृती जास्तच खराब झाल्यामुळे त्यांना पुन्हा तेलंगणा राज्यातील हैद्राबाद येथील हायटेक सिटीतील यशोधा हॉस्पिटलमध्ये हलवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिल्यानंतर त्यांना तात्काळ हलवण्यात आले असून या खुनी हल्यात त्यांचा डावा हात डावा पायाची हाड मोडली असून संपूर्ण शरीरावर जखमा झाल्या आहे.
महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (एमआरआयडीसी) कडून प्रकल्प व्यवस्थापक त्यागराजन परशुराम यांच्यावरील या दुर्दैवी खुनी हल्याची गंभीर दखल घेण्यात आली असून डिजीएम राकेशकुमार शर्मा (स्ट्रक्चर्स) यांनी या घटने संदर्भात परभणी जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांना दि.०७ जुन २०२३ रोजी लेखी स्वरुपात तक्रार देऊन या घटनेतील आरोपी शेख अतिख शेख बशीर यांच्यासह त्यांच्या सहकारी आरोपींवर कठोर कारवाईसह आरओबीचे बांधकाम पुन्हा सुरू करण्यासाठी पोलीस संरक्षणाची मागणी केली असून या भयावह घटनेमूळे रेल्वे उड्डाण पुलाचे बांधकाम पुर्णपणे ठप्प झाले असून या ठिकाणी कामावर कार्यरत अभियंते,पर्यवेक्षक कर्मचारी आणि कामगार कामाच्या ठिकाणी येण्यास अक्षरशः भयभीत झाले असून स्थानिक दुष्कृत्ये/असामाजिक घटकांनी यापूर्वी देखील अश्याच प्रकारे दुष्कृत्य करुन दहशत माजवण्याचे प्रकार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे दरम्यान या घटने संदर्भात इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि.कंपनीचे डायरेक्टर श्री.रामकुमार कुंडेटी यांनी परभणी जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीमती रागसुधा आर. व जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांच्या प्रत्यक्ष भेट घेऊन या घटने संदर्भात तक्रार दिली असून ते लवकरच नांदेड दौऱ्यावर येत असलेल्या केंद्रीय गृहमंत्री श्री.अमीत शहांची भेट घेऊन या घटनेतील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करणार आहेत...
0 टिप्पण्या