💥शिवरस्ता बंद झाल्याने माजी सैनिक शेतकरी न्यायासाठी त्रस्त : तहसिलदारांसह महसुल प्रशासनातील अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष💥
पुर्णा ( दि.१३ जून २०२३) - भारतीय सैन्य दलात तब्बल २८ वर्षे देशसेवा करीत सेवानिवृत्त झालेल्या एका माजी सैनिक शेतकऱ्याला न्यायासाठी तहसिल कार्यालयात अक्षरशः पादत्राण फाटोस्तर चकरा माराव्या लागतात तरीही न्याय मिळत नाही तर माग जनसामान्यांना काय न्याय मिळणार ? शासनाचे आडमाप वेतन अन् त्यावर वरकमाई त्यामुळे संबंधित अधिकारी/कर्मचारी सर्वसामान्यांच्या कामांकडे काय म्हणून लक्ष देणार ? 'दिन जाव गंडे आव' दुपारी ११-३० ते १२-०० वाजेच्या सुमारास कार्यालयात आल तर यायच अन् सायंकाळी ०५-०० ते ०५-३० वाजेच्या सुमारास निघून जायच एकंदर अशी परिस्थिती शासकीय कार्यालयांची झाली असल्यामुळे तक्रारदारांना न्यायासाठी 'चक्कर पे चक्कर' माराव्या लागतात अशीच परिस्थिती तहसिल कार्यालयाची झाली आहे.
पुर्णा तालुक्यातील पांगरा येथील रहिवासी असलेले सेवानिवृत्त माजी सैनिक संभाजी सहादू कापूरे वय ७२ वर्षे हे भारतीय सैन्य दलात २८ वर्ष देशाच्या संरक्षणाची जवाबदारी बजावून सेवानिवृत्त झाल्यावर त्यांनी कुटूंबाच्या उदरनिर्वाहासाठी तालुक्यातील गोविंदपूर शिवारातील गट क्रमांक १०६ मध्ये काही वर्षापूर्वी साडेआठ एक्कर शेतजमीन खरेदी केली. परंतु त्या जमिनीकडे जाण्यासाठीचा गौर-गोविंदपूर शिवरस्ता दोन्ही बाजूकडील शेतकऱ्यांनी अतिक्रमण करुन बळकावल्यामुळे काढून घेतला शिवरस्ता ब्लॉक झाल्यामुळे माजी सैनिक कापूरे यांच्या शेतातील ऊस,हळद व अन्य पिकाची वाहतूक करणे या शिवाय शेतात पेरणीसाठी रस्त्याअभावी बियाणे खते वाहतूक करणे मुश्किल झाले आहे. त्यांनी अनेक वेळा पुर्णा तहसीलदार यांना अर्ज करुन रस्ता मोकळा करण्याची मागणी केली परंतु त्यांच्या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे त्यांची न्यायीक मागणी निष्फळ ठरली असून तहसिलदारांनी सबंधित तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना आदेश देवून सदर शिवरस्ता मोकळा करण्यास सांगितले होते. परंतु त्या तलाठ्याने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाला न जुमानल्यामुळे अद्याप काहीच कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे देशाचे संरक्षण केलेले माजी सैनिक संभाजी कापूरे यांची मोठी व्यथा झाली आहे अनेक वेळा तहसील कार्यालयाला चकरा मारुन हैराण झाले आहेत. त्याचे म्हणणे आहे की, केवळ स्वातंत्र्य दिन आणि गणतंत्र दिन या दिवशीच "जय जवान जय किसान" नारा दिला जातो. मात्र माझ्या सारख्या माजी सैनिकाला परभणी जिल्हा प्रशासन न्याय देवू शकत नाही तर सर्वसामान्यांचे या देशात काय हाल असतील ? परभणी जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी आंचल गोयल व तहसीलदार माधवराव बोथीकर यांनी शुध्दा दुर्लक्ष केले आहे. आता तरी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याचे कष्ट घेऊन त्यांना न्याय द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे........
0 टिप्पण्या