🌟महिलांचा सन्मान न करणाऱ्या ग्रामसेवकाचा सोमवारी शेळगाव येथील अहिल्या प्रेमींनी बेशरमाची फुले देऊन केेला सत्कार🌟
प्रतिनिधी
गंगाखेड (दि.05 जुन) - 31 मे रोजी ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित न राहत राजमाता अहिल्यादेवी जयंती साजरी न करणे व दोन महिलांचा सन्मान न करणाऱ्या ग्रामसेवकाचा सोमवारी शेळगाव येथील अहिल्या प्रेमींनी बेशरमाची फुले देऊन सत्कार केला. परभणी लोकसभा मतदारसंघाचे 2024 चे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांनी ग्रामसेवकावर कारवाईची मागणी जिल्हाधिकाऱ्याकडे केली.
31 मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती प्रत्येक कार्यालयात साजरी करण्याचे आदेश असूनही शेळगाव तालुका सोनपेठ येथील ग्रामसेवक स्वामी हे होळकर जयंतीला ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित नव्हते. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने ग्रामपंचायत हद्दीतील दोन महिलांचा सन्मान करणे आवश्यक असतानाही ग्रामसेवक उपस्थित न राहिल्याने हा महिला सन्मानाचा कार्यक्रमही होऊ शकला नाही. याचा जाब विचारण्यासाठी सोनपेठ तालुक्याचे धनगर समाजाचे नेते पिंटू आळशे, शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष विश्वंभर गोरवे यांच्या नेतृत्वाखाली जमलेल्या अहिल्या प्रेमींनी ग्रामपंचायत कार्यालय गाठत जाब विचारला. स्वामी यांनी झालेल्या चुकीची थोडीहि लाज न बाळगल्याने अहिल्या प्रेमी चांगलेच संतप्त झाले होते. ही बाब समजतात परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकारी यांना दोषीवर कार्यवाही करण्याची विनंती केली.....
0 टिप्पण्या