🌟विदर्भातील बुलढाण्यात हृदयविदारक घटना : अपघातात डिझल टँक फुटल्याने प्रवासी बसला भीषण आग....!


🌟लग्नासाठी जात असलेल्या या बसमधील २५ वऱ्हाडी जिवंत जळाले🌟

बुलडाणा (०१ जुलै २०२३) : विदर्भवासीयांची आज जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी घडलेल्या अत्यंत हृदयविदारक दुर्घटनेने मन हेलावून गेली आज शनिवार दि.०१ जुलै रोजी मध्यरात्री ०१-३५ वाजेच्या सुमारास बुलढाण्यातील समृद्धी महामार्गावर नागपूरहून पुण्याला लग्न समारंभासाठी ३३ वऱ्हाडी घेऊन निघालेली खाजगी बस पावसामुळे पोलला धडकल्याने रस्त्यावरून घसरल्यामुळे बसचा डिझेल टँक फुटून बस मधील  तब्बल २५ वऱ्हाडी जिवंत जळाल्याचे हृदयविदारक वृत्त हाती आले आहे.

हा भयंकर अपघात समृद्धी महामार्गावर घडला असून हाती आलेल्या वृत्तानुसार या खाजगी बसमध्ये एकूण ३३ प्रवासी प्रवास करत होते. या बसमधील २५ प्रवाश्यांचा होरपळून मृत्यू झाला आहे आज शनिवार दि.०१ जुलै २०२३ रोजी मध्यरात्री ०१-३५ वाजेच्या सुमारास हा भयंकर अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे सदरील प्रवासी बस नागपूरहून पुण्याला जात असताना हा दुर्दैवी अपघात झाला.बस एका पोलला धडकल्याने घसरल्याचे समजते.....टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या