🌟पुर्णा तालुक्यातील राजकीय क्षेत्रातील सुसंस्कृत निष्कलंक नेतृत्व काळाच्या पडद्याआड....!


🌟पुर्णा नदीकाठावरील हिंदुस्मशान भुमीत डॉ.संजय लोलगे यांच्या पार्थिवावर जनसमुदायाच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार🌟 


पुर्णा (दि.१३ जुन) - मराठवाठा-विदर्भातील सहकार क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवून बि-बियाने महामंडळ तसेच पुर्णा सहकारी साखर कारखाना वसमतवर मागील जवळपास दोन दशकापासून निवडून येत पुर्णा तालुक्याचे वर्चस्व कायम ठेवणारे सुसंस्कृत व निष्कलंक व्यक्तीमत्व जेष्ठ काँग्रेस नेते व पुर्णा तालुका काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष डॉ.संजय प्रकाश लोलगे यांचे काल सोमवार दि.१२ जुन २०२३ रोजी दुपारच्या सुमारास हृदयविकाराच्या तिव्र झटक्याने दुःखद निधन झाले होते त्यांच्या पार्थिवावर आज मंगळवार दि.१३ जुन २०२३ रोजी सकाळी १०-३० ते ११-०० वाजेच्या सुमारास येथील पुर्णा नदी काठावरील हिंदु स्मशानभुमीत हजारोंच्या संख्येने आलेल्या जनसमुदायाच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी परभणी/नांदेड/हिंगोलीसह इतर जिल्ह्यांतून देखील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली मृत्यू समयी डॉ.संजय लोलगे यांचे वय ६० वर्ष होते राजकीय क्षेत्रातील अत्यंत सुसंस्कृत मनमिळावू व निष्कलंक व्यक्तीमत्व म्हणून डॉ.संजय लोलगे साहेबांची ओळख होती त्यांच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत त्यांनी कधीही द्वेषपुर्ण किंवा कुटील राजकारण केले नाही ते आपल्याकडे आलेल्या प्रत्येक व्यक्तीचे समाधान करुनच त्याला पाठवायचे हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील पुर्णा सहकारी साखर कारखान्याचे सदस्य म्हणून डॉ.लोलगे साहेब मागील विस वर्षापासून कार्यरत असतांना त्यांनी पुर्णा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कुठेही अडचन येवू दिली नाही असे हे सुसंस्कृत मनमिळावू व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड गेल्यामुळे पुर्णा तालुक्यासह परभणी,हिंगोली,नांदेड जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत असून त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी परभणी जिल्हा काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री आमदार सुरेशराव वरपुडकर,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस तथा माजी खासदार ॲड.तुकाराम रेंगे पाटील,माजी सहकार मंत्री तथा पुर्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन जयप्रकाश दांडेगावर,वसमत विधानसभा मतदार संघाचे आमदार राजुभैया नवघरे,परभणी जिल्हा शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख सुधाकर खराटे,शिवसेना ठाकरे गटाचे परभणी जिल्हा प्रमुख विशाल कदम,नांदेड जिल्हा काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते संतोष पांडागळे,मा.जिल्हा परिषद सदस्य भगवानराव धस,सोनार समाजाचे जेष्ट नेते सुधाकरभाऊ धानोरकर,पुर्णा शहरातील प्रतिष्ठित व्यापारी किरण कुल्थे,प्रतिष्ठित व्यापारी अमित कुल्थे,आनंदशेठ अजमेर, पुर्णा नगर परिषदेचे नगरसेवक ॲड.राजेश भालेराव,ॲड.हर्षवर्धन गायकवाड,ॲड.अशोक धबाले,माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक उत्तमभैया खंदारे,माजी नगराध्यक्ष जाकीर कुरेशी,मा.नगरसेवक अखील अहेमद,मा.नगर सेवक संतोष एकलारे,माजी नगरसेवक प्रविण एकलारे,जेष्ठ पत्रकार लक्ष्मीकांत शिंदे,अतुल शहाणे यांच्यासह प्रतिष्ठित नागरिक,व्यापारी,पत्रकार,वकील,डॉक्टर्स शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या