🌟 प्रा.डॉ.उज्वलाताई अनिल कांबळे यांना पीएचडी डिग्री प्रदान....!


🌟पुर्णा येथील समाजसेवक मास्टर अनिल कांबळे यांच्या सौभाग्यवती आहेत🌟 


संभाजी नगर (औ.बा.) - येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात दि.२७ जुन २०२३ रोजी ६३ वा दिक्षांत सोहळा समारोह कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमात राज्यपाल व कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर येवले यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना दिक्षांत सोहळ्यात डिग्री प्रदान करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत शिक्षण शास्त्र विभागाच्या माध्यमातून संभाजी नगर (औ.बा.) शहरातील विद्यार्थ्यांचा बाल गुन्हेगारीकडे प्रवृत्त होण्याच्या कारणांचा शोध व उपाय योजना एक अभ्यास या विषयात डॉ.धनंजय वडमारे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.उज्वला कांबळे यांनी पीएचडी पुर्ण केली आहे त्या पूर्णा येथील समाजसेवक मास्टर अनिल कांबळे यांच्या पत्नी आहेत कांबळे परिवारातील एकमेव महिला पीएचडी पदवी धारक असून असून त्या कांबळे परिवारातील चौथ्या पीएचडी धारक झाल्या आहेत.


 या अगोदर डॉक्टर दयानंद कांबळे डॉक्टर अरविंद कांबळे डॉक्टर राहुल कांबळे यांनी पीएचडी मिळवून डॉक्टरेट मिळवले आहे कांबळे परिवारातील महिला डॉक्टरेटर होण्याचा मान त्यांना मिळाला असून पूर्णा व परिसरात व पाहुणे मंडळी त्यांचे कौतुक केले जात आहे त्यांचे या अनुषंगाने धम्म गुरु डॉक्टर उपगुप्त महाथेरो प्राचार्य मोहनराव मोरे जगदीश जोगदंड डॉक्टर भुताळे  श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व उद्योजक राम भोगले, भीमाशंकर पाडळकर संस्थाचे  अध्यक्ष अनिल पाडळकर' प्राचार्य सुनील पाडळकर सुप्रसिद्ध नेत्र तज्ञ डॉ  श्रीरंग देशपांडे प्रसिद्ध उद्योजक डॉ अशोक भालेराव प्राचार्य विश्वरूप निकुंभ आदींनी अभिनंदन केले  दीक्षांत  समारंभात मिळालेली डॉक्टर ऑफ फिलॉसॉफर ही डिग्री व शोध प्रबंध प्राध्यापिका डॉक्टर उज्वला व मास्टर अनिल कांबळे यांनी तथागत भगवान बुध्द यांच्या चरणी अर्पण केला....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या