🌟परभणी महानगर पालिका पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा खंडीत....!


🌟परभणी मनपाकडे महावितरण कंपनीची चार कोटी रुपयांची थकबाकी : मनपा प्रशासन हतबल🌟

परभणी (दि.०८ जुन २०२३) : परभणी महानगर पालिका पाणी पुरवठा विभागाकडे तब्बल ०४ कोटी रुपयांची थकबाकी असल्यामुळे आज गुरुवार दि.०८ जुन २०२३ रोजी वीज पुरवठा महावितरण कंपनीने पाणी पुरवठा योजनेची विद्युत पुरवठा खंडीत करण्याची कारवाई केली. 

          वीज वितरण कंपनीच्या अभियंत्यांनी वीज बिलाच्या वसूलींसाठी गुरुवारी दुपारी धर्मापुरी येथील जलशुध्दीकरण केंद्र व राहटी येथील पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा खंडीत केला. महापालिकेकडे या अभियंत्यांनी थकीत वीज बिलापोटींची वसूली मिळावी या दृष्टीने सातत्याने पाठपुरावा केला. परंतु, महापालिका प्रशासनाने आर्थिक स्थिती बिकट आहे. मालमत्ता कराचा भरणा वाढल्याशिवाय मनपाकडे निधी जमा होणार नाही, असे स्पष्ट करीत पंधराव्या वित्त आयोगाचा दुसरा हफ्ता देखील आला नाही, असे निदर्शनास आणून दिले. परंतु, अभियंत्यांनी त्या गोष्टीची फारशा गांभीर्याने दखल घेतली नाही. दरम्यान पाणी पुरवठा योजनेचाच वीज पुरवठा खंडीत केल्याने पावसाळ्याच्या तोंडावर शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत होईल की काय अशी भिती निर्माण झाली आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या