🌟जालना ते जळगाव नवीन रेल्वे मार्गास भरीव तरतूद : राज्य मंत्रीमंडळातून निधीस मंजूरी.....!


🌟मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत तब्बल 3 हजार 552 कोटी रूपयांच्या निधीला मंजूरी🌟 

परभणी (दि.28 जुन 2023) :  जळगाव ते जालना रेल्वे मार्गासाठी तब्बल 3 हजार 552 कोटी रूपयांच्या निधीला राज्य मंत्रीमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत मान्यता बहाल करण्यात आली दरम्यान, जालना ते जळगाव अंतर आजच्या परिस्थितीत 340 किलोमीटर एवढे आहे. या मार्गामुळे हे अंतर कमी होऊन तब्बल 174 किलोमीटर होणार आहे.म्हणजेच प्रवाशांचा वेळ आणि खर्च जवळपास निम्म्याने कमी होणार आहे.

            राज्य मंत्रीमंडळाची बैठक बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यात मराठवाडावासीयांसाठीच्या महत्वाकांक्षी असा मोठा निर्णय म्हणजे जळगाव ते जालना रेल्वे मार्गासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. या नव्याने बनणार्‍या ब्रॉड गेज रेल्वे मार्गासाठी 3 हजार 552 कोटी रूपयांच्या निधीला मान्यता देण्यात आली आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे आणि खासदार उन्मेष पाटील व रक्षा खडसे यांच्या पुढाकाराने जळगाव ते जालना या रेल्वे मार्गाच्या कामाला गती मिळाली आहे. आधी या मार्गाचे सर्व्हेक्षण पूर्ण झाले होते. तर याला आज मोठ्या रकमेच्या निधीची मान्यता मिळाल्याने या रेल्वे मार्गाच्या कामाचा रस्ता मोकळा झाल्याचे मानले जात आहे.

          दरम्यान, जालना ते जळगाव हा प्रस्तावित रेल्वे मार्ग 174 किलोमीटर लांबीचा आहे. यात जालना, पिंपळगाव, पांगरी, राजूर, भोकरदन, सिल्लोड, गोळेगाव, अजिंठा, फर्दापूर, पहूर आणि जळगाव अशी स्थानके राहणार आहेत. यात याच मार्गावरील अजून काही स्थानकांचा समावेश होण्याची शक्यता आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या