🌟ऑनलाईन फॉर्म भरण्याचा कालावधी दि. 13 ते 19 जुन 2023 पर्यंत🌟
हिंगोली (दि.16 जुन 2023) : हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यातील तोंडापूर (वारंगा फाटा) येथील कृषी विज्ञान केंद्रात कृषी प्रमाणपत्र व कृषी पदविका शिक्षणक्रमाच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. या शैक्षणिक वर्षात 1) माळी प्रशिक्षण प्रमाणपत्र (कालावधी एक वर्ष) पात्रता - दहावी पास/नापास, 2) कृषी अधिष्ठान (कालावधी एक वर्ष) पात्रता बारावी पास/नापास किंवा माळी प्रशिक्षण प्रमाणपत्र शिक्षणक्रम पास, 3) कृषी व्यवसाय व्यवस्थापन पदविका/ फळबाग उत्पादन पदविका/ भाजीपाला उत्पादन पदविका/ फुलशेती व प्रांगणउद्यान उत्पादन पदविका/ उद्यानविद्या पदविका/ कृषी पत्रकारिता : (कालावधी एक वर्ष) पात्रता : कृषी अधिष्ठान शिक्षणक्रम पास किंवा पारंपरिक कृषी विद्यापीठाचा कृषी पदविका शिक्षणक्रम पास या शिक्षणक्रमासाठी प्रवेश सुरु आहे.
ऑनलाईन फॉर्म भरण्याचा कालावधी दि. 13 ते 19 जून, 2023 हा असून अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल. कृषि शिक्षणक्रम माहिती पुस्तिका व प्रवेश फॉर्म भरण्यासाठी https://ycmouagri.digitaluniversity.ac/StaticPages/HomePage.aspx या लिंकवर पर्याय उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्राचे केंद्र प्रमुख डॉ. पी. पी. शेळके (मो. 9765390976), केंद्र संयोजक अनिल ओळंबे (मो.7588153193) यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. पी. पी. शेळके यांनी केले आहे.....
0 टिप्पण्या