🌟मॉडेल इंग्लिश एज्यूकेशन सोसायटीच्या गतवैभवासाठी सर्वांनी प्रयत्न करावे - जिल्हाधिकारी आंचल गोयल


🌟पालकांनी शैक्षणिक वर्षात पाल्यांचे प्रवेश‍ करून घेण्याचे आवाहन : पाल्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नरत राहावे🌟

परभणी (दि.०२ जुन २०२३) : विद्यार्थी केंद्रबिंदू मानून यंदाच्या शैक्षणिक वर्षात मॉडेल इंग्लिश एज्यूकेशन सोसायटीला सर्वांनी मिळून संस्थेला गतवैभव प्राप्त करून द्यावे. संस्थेच्या पायाभूत सुविधा कर्मचारी अडीअडचणी लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडाविषयक विकासासाठी सर्व सदस्यांनी अधिक प्रयत्न करण्याचे आवाहन मॉडेल इंग्लिश एज्यूकेशन सोसायटीच्या पदसिद्ध अध्यक्षा तथा जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांनी आज येथे केले. 

शारदा महाविद्यालयात आज मॉडेल इंग्लिश एज्यूकेशन सोसायटीची आढावा बैठक घेतली. निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती स्वाती दाभाडे, मॉडेल इंग्लिश स्कूल, शारदा प्राथमिक विद्यालय, शारदा माध्यमिक विद्यालय आणि शारदा कनिष्ठ महाविद्यालय, शारदा वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, त्याचबरोबर प्राचार्य व मुख्याध्यापक संजय जोशी, मुख्याध्यापक नितीन जैस्वाल, मुख्याध्यापिका श्रीमती कंधारकर, प्राचार्य डॉ. काझी कलिमोद्दीन आणि संस्थेचे नवनिर्वाचित सर्वसाधारण सभासद प्रकाश केंद्रेकर, ओमप्रकाश तलरेजा, डॉ. रामेश्वर नाईक, डॉ. जगदीश नाईक, डॉ. श्रीकांत मणियार, डॉ. केदार खटींग, डॉ. दुर्गादास कानडकर, प्रल्हाद लाड आणि डॉ. अनिकेत सराफ, ॲड. रमेश शर्मा आदी बैठकीला उपस्थित होते. 

या एज्युकेशन सोसायटीच्या  ५४ वर्षांचा इतिहास, त्याचे पूर्वीचे गतवैभव आणि नावलौकिक नव्याने प्राप्त करून देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. या सोसायटीच्या माध्यमातून शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, यासाठी नवनवीन उपक्रम राबविण्यात यावेत. यंदाच्या शैक्षणिक वर्ष २०२३-२४ चा आढावा घेत पालकांनी आपल्या पाल्यांचे प्रवेश करून घेण्याबाबतही त्यांनी आवाहन केले. 

मॉडेल इंग्लिश एज्यूकेशन सोसायटीच्या अध्यक्षा श्रीमती गोयल यांच्या मार्गदर्शनात आगामी शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये विविध नवनवीन उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांमधील अनेक कलागुण ओळखणे, त्यांच्या गुणांना वाव मिळावा, ती त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची नवी ओळख तयार व्हावी. त्यासाठी या सोसायटीच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्यासाठी सर्व प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक आणि कर्मचारीवृंदांनी यामध्ये पुढाकार घ्यावा, असेही श्रीमती गोयल यांनी सांगितले.  

यावेळी मॉडेल इंग्लिश एज्यूकेशन सोसायटीच्या सर्वसाधारण सभासदांना विभागवार काम करण्यासाठी जबाबदारी देऊन संस्थेचा विकास साधावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती स्वाती दाभाडे यांनी केले. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन उपप्राचार्य डॉ. एस. पी. वाघमारे यांनी केले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या