🌟कार्यक्रमाची सुरुवात कै.भुजंगरावजी नारायणरावजी कदम (दादा) यांच्या प्रतिमा पूजनाने झाली🌟
पुर्णा (दि.१६ जुन २०२३) - येथील श्री गुरु बुद्धिस्वामी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना,अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष तसेच वनस्पतीशास्त्र विभाग यांच्या संयुक्तविद्यमाने कै. भुजंगरावजी नारायणरावजी कदम (दादा )यांच्या द्वितीय पुण्य स्मृतिदिना निमित्त रोज गार्डन विकसित करण्यासाठी गुलाबांचे वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात कै. भुजंगरावजी नारायणरावजी कदम (दादा) यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. संस्थेचे कार्याध्यक्ष मा. प्रमोदअण्णा एकलारे, सचिव मा. अमृतराज कदम, कोषाध्यक्ष मा. उत्तमरावजी कदम, सहसचिव मा. गोविंदराव कदम, जेष्ठ संचालक डॉ दत्तात्रेय वाघमारे, मा साहेबरावजी कदम यांच्या हस्ते कै भुजंगराव कदम यांना अभिवादन करण्यात आले.
16 जून हा श्रद्धेय भुजंगरावजी कदम (दादा) यांचा स्मृतिदिन महाविद्यालयात दरवर्षी वृक्षारोपणाचे आयोजन करून साजरा करण्यात येतो. दादाचे निसर्गावर खूप प्रेम होते मनुष्याचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी स्वच्छ ऑक्सिजन आणि हवा आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी वृक्ष नेहमी मदत करतात ते म्हणत. दादांनी आपल्या सहकार्याच्या साथीने 1983 मध्ये पेरलेल्या श्री गुरु बुद्धिस्वामी महाविद्यालयाच्या ज्ञानदानाच्या बीजाला आलेली ती सुमधुर फुले सर्व देशभर पसरली यांचा आनंद त्यांना नेहमी वाटत असे.म्हणून गुलाबाचे फुल त्यांच्या आवडीचा विषय. 5 सप्टेंबर ह्या शिक्षकदिनी दादा नेहमी न चुकता सर्व महाविद्यालयातील शिक्षकांना गुलाबाचे फुल देत असत. हाच दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून दादांच्या आठवणीत महाविद्यालयाच्या वतीने गुलाबाच्या फुलाचा बगीचा (रोज गार्डन) विकसित करण्यात येत आहे. याची सुरुवात आज गुलाबांची रोपे लावून करण्यात आली. या कार्यक्रमाला सर्व संचालक मंडळी, जेष्ठ संचालक, दादावरप्रेम करणारे सर्व प्रतिष्ठित मान्यवर, हितचिंतक महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.....
0 टिप्पण्या