🌟शिवसेनेच्या ५७ व्या वर्धापन दिनानिमित्त मराठवाड्यातील पहिल्या मोफत रुग्णवाहिका सेवेचा लोकार्पण सोहळा संपन्न...!


🌟शिवसेना महानगरप्रमुख प्रवीण देशमुख यांचा पुढाकार : शिवसेना (शिंदे) गटाचे नेते सईद खान यांच्या हस्ते झाले लोकार्पण🌟 


परभणी (दि.२१ जुन २०२३) : शिवसेनेच्या ५७ व्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेना (शिंदे) गटाचे महानगरप्रमुख या नात्याने शिवसेनेचे नेते प्रवीण देशमुख यांनी परभणी शहर आणि ग्रामीण भागातील रुग्णांच्या मदतीकरीता आज बुधवार दि.२१ जुन रोजी मराठवाड्यातील पहिली मोफत रुग्णवाहिका सेवा सुरु केली असून शिवसेना (शिंदे) गटाकडून घेतलेल्या जनहीतवादी उपक्रमाचे जनसामान्यांतून कौतुक होत आहे.

               शिवसेनेचे नेते (शिंदे गट) सईद खान यांच्या हस्ते या मोफत रुग्णवाहिका सेवेचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी अशोक कर्‍हाळे, संभाजी ब्रिगेडचे विभागीय कार्याध्यक्ष नितीन देशमुख, बालाजी मोहिते, आसेफ भाई, सचिन जोशी, कैलास झाडे, नजर खान आदी उपस्थित होते. यावेळी देशमुख यांनी आपण हिंदुर्‍हदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा खर्‍या अर्थाने चालविणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लोकसेवेचा, विचारांचा वारसा पुढे नेण्याच्या हेतूने शिवसेनेच्या ५७ व्या वर्धापन दिनानिमित्त रुग्णांना मदतीसाठी हा उपक्रम हाती घेत आहोत, असे नमूद केले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या